Dental treatment  | तीनशे रुग्णांवर मोफत  दंत उपचार | रामकृष्ण मठ दंतउपचार विभाग व  रोटरी क्लब ऑफ पुणे चा उपक्रम

Homeपुणेsocial

Dental treatment | तीनशे रुग्णांवर मोफत  दंत उपचार | रामकृष्ण मठ दंतउपचार विभाग व  रोटरी क्लब ऑफ पुणे चा उपक्रम

Ganesh Kumar Mule Jun 28, 2022 3:39 PM

Uruli Devachi and Fursungi | कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन उरुळी व फुरसुंगी गावे वगळली जाणार! | मुख्य सभेसमोर प्रस्ताव 
Health check-up camp for women journalists | सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत महिला पत्रकारांसाठी दोन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन
Pune Zilha Sahkari Dudh Utpadak Sangh | Mahavikas Aghadi Pune | क्रीडांगण आरक्षणा वरून महाविकास आघाडी उद्या करणार आंदोलन 

तीनशे रुग्णांवर मोफत  दंत उपचार

पुणे-  रामकृष्ण मठ दंतउपचार विभाग व  रोटरी क्लब ऑफ पुणे, (सिनर्जी) यांच्या  वतीने मोफत   दंत चिकित्सा व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले. त्यामध्ये  तीनशेहुन अधिक रुग्णांवर  दंत उपचार करण्यात आले.
विशेष म्हणजे अक्कलदाढेच्या दुखण्याने त्रस्त असलेल्या सत्तरहुन अधिक रुग्णांना शिबिराचा मोठा लाभ झाला. तसेच मुखकर्करोग तसेच तोंडाचे इतर आजार असलेल्या रुग्णांची चिकित्सा व मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले.
या  शिबिरामध्ये  डॉ जनार्दन गार्डे, डॉ श्रुती गार्डे, डॉ दत्तप्रसाद दाढे, डॉ अनुजा खाडेलकर, डॉ राहुल दिघे व डॉ धृति गार्डे यांनी रुग्णांची तपासणी करुन उपचार घेतले.
रामकृष्ण दंतउपचार विभागाच्या पूर्व प्रमुख व रोटरी क्लब (सिनर्जी) आरोग्य विभाग प्रकल्प प्रमुख डॉ.श्रुति गार्डे यांनी या शिबिरासाठी विशेष मार्गदर्शन केले. योग्य वेळी तोंडाच्या कर्करोगाचे निदान होणे व तरुण पिढीला तंबाखू /धूम्रपानासारख्या घातक व्यसनांपासून परावृत्त करणे ही काळाची गरज आहे असे मत डॉ श्रुति गार्डे यांनी व्यक्त केले.
हे  शिबिर यशस्वी होण्यासाठी रामकृष्ण मठाचे आरोग्य विभाग प्रमुख स्वामी कृपाघनानंद, अरुणा कुडले, डॉ चेतन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच रोटरी क्लब ऑफ पुणे (सिनर्जी)चे अध्यक्ष  विकेश छाजेड व डॉ अर्चना शिंगवी यांनी हा उपक्रम पार पाडण्यासाठी विशेष सहकाये केले.
‘मानव जातीची निस्वार्थी सेवा हेच रामकृष्ण मिशनचे खरे ध्येय आहे व त्यासाठी तळागाळातील रुग्णांसाठी वेळोवेळी निःशुल्क सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील’ असे प्रतिपादन स्वामी कृपाघनानंद यांनी शिबिराचा समारोप प्रसंगी केले.