राज ठाकरेंच्या सभेला उपस्थित अंध विद्यार्थ्यांसोबत राज यांचा संवाद! काय प्रश्न विचारला राज ठाकरेंनी?
पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेला काही अंध विद्यार्थी उपस्थित होते. ठाकरेंनी त्यांना सन्मानाने व्यासपीठावर बसवले. अंध विद्यार्थ्यांनी राज ठाकरे कडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. दरम्यान व्यासपीठावर सभा झाल्यानंतर राज ठाकरेंनी या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी याल का असा प्रश्न विचारला, त्यावेळी त्यांनी सांगितले कि आम्ही कुठेही यायला तयार आहोत.
राज यांच्या प्रत्येक भूमिका महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वाची असून त्यांनी महागाई, गॅस दरवाढ अशा मुद्दयांना हात घातला पाहिजे असे मत या अंध तरुणांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, लहानापासूनच राज यांची भाषण ऐकत आलो आहे. राज ठाकरेंच्या सगळ्या भूमिका आक्रमक आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आक्रमक दाखवणारे दुसरे नेतृत्व नाही. बाळासाहेबानंतर राज साहेबच राज्याचा विकास करू शकतात असं ते यावेळी म्हणाले आहेत.
सामान्य माणसांच्या समस्येवरही बोलायला हवे
आम्हाला त्यांचे मराठी पाट्या, भोंगे हे मुद्दे महत्वाचे वाटतात. अयोद्धेबाबत ते आज बोलणार आहेत. त्यांनी सर्वच लाऊडस्पिकर बंद करण्याची भूमिका घेतली आहे. ती सामान्य नागरिकांसाठी योग्यच आहे. पण त्याबरोबरच राज यांनी महागाई, गॅस दरवाढ याबाबत बोलायला पाहिजे. एखाद्या वेळेस नोकरदार वर्ग गॅस घेऊ शकतो. पण गोरगरिबाने कुठं जायचं. त्यांना गॅस दरवाढ परवडत नाही. जर राज ठाकरेंनी याबाबत भूमिका घेतल्यास दरवाढ कमी होण्याची शक्यता आम्हाला वाटते. असा राज ठाकरेंवरचा विश्वास या अंध तरुणांनी यावेळी व्यक्त केला आहे.
COMMENTS