महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय नकाशे प्रसिद्ध
पुणे – अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर चार दिवसानंतर निवडणूक आयोगाने आज (ता. १७) प्रभाग निहाय नकाशे महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केले. त्यामुळे प्रभाग रचनेत नेमके कसे आणि कुठे बदल झाले हे स्पष्ट समजणार आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणूकीसाठी तीन सदस्यांचा प्रभाग असणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेत आडवे तिडवे प्रभाग तयार केले होते, नैसर्गिक हद्दींचे पालनही करण्यात आले नव्हते. या प्रभाग रचनेमुळे अनेक इच्छुकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.त्यामध्ये सुधारणा व्हाव्यात यासाठी हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. निवडणूक आयोगाने १३ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली, पण प्रभागात बदल केल्याचे नकाश उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे नेमके प्रभाग कसे बदलले याची माहिती मिळत नव्हती. अधिसूचना वाचून बदल समजत नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता.निवडणूक आयोगाने आज प्रभागनिहाय नकाशे जाहीर केले आहेत. त्यात ५८ पैकी ३२ प्रभागात बदल केले असल्याने ते बदल कसे आहेत याची उत्सुकता लागली आहे.
या संकेतस्थळावर पाहू शकाल नकाशे
https://www.pmc.gov.in/en/pmc-final-prabhag-rachna-2022
‘महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रभाग निहाय नकाशे उपलब्ध केले आहेत. तसेच महापालिका मुख्य इमारत व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नकाशे पहाण्यासाठी उपलब्ध आहेत.’
COMMENTS