इच्छुकांना खरेच कळेना … कामाला लागायचे की शांत बसायचे?
: निवडणूक कधी होईल याचा काहीच अंदाज लागेना
पुणे : महापालिका निवडणूक कधी होणार, हे वरचेवर गुलदस्त्यातच राहत चालले आहे. महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेची अधिसूचना आणि प्रभागाचा नकाशा जाहीर केला खरा, मात्र त्यामुळे स्पष्टता येण्यापेक्षा गोंधळच वाढताना दिसतो आहे. यामुळे इच्छुकांना खरेच कळेना … कामाला लागायचे की शांत बसायचे?
पुणे महापालिका निवडणूक लढवण्यासाठी बरेच इच्छुक आहेत. गेल्या कित्येक दिवसापासून नाही तर महिन्यापासून हे लोक निवडणूक होण्याची वाट पाहत आहेत. मात्र वाट पाहणे एवढा एकच पर्याय त्यांना वापरावा लागत आहे. कारण कितीतरी दिवस फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार अशी भाकिते वर्तवली जात होती. मात्र obc आरक्षणाच्या मुद्द्याने यावर पाणी फेरले. मग महापालिकेत प्रशासक आले. पुन्हा असे वाटले कि मे महिन्यात निवडणूक होऊ शकेल. मात्र त्यावेळी ही निराशाच पदरी आली. त्यानंतर मग सुप्रीम कोर्टानेच निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे कशीतरी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. मग मरगळ झटकत महापालिका प्रशासनाने अर्धवट प्रभाग रचना जाहीर केली. यामुळे देखील स्पष्टता येत नाही.
अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यासाठी 17 मे ही तारीख देण्यात आली होती. मात्र त्याआधीच प्रभाग रचना जाहीर झाल्याने इच्छुकांना खरेच वाटेना. मग महापालिकेच्या वेबसाईट वरील नकाशे बघून सत्यता पटू लागली. मात्र अजूनही चित्र स्पष्ट व्हायला तयार नाही. कारण आता आरक्षण कधी जाहीर होणार? याबाबत उत्सुकता आहे. बरं आरक्षण जाहीर झाले तरी निवडणूक जून महिन्यात होणार कि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये याबाबत ही कुठली निश्चितता आलेली नाही. कारण जून च्या शेवटी निवडणूक घ्यायची म्हटले तर ते शक्य होताना दिसत नाही. कारण त्याच कालखंडात पालखीचे आगमन होणार आहे. यावेळी तर मुक्काम देखील वाढला आहे. पालखीच्या आधी घ्यायचे म्हटले तर प्रशासनाची तेवढी तयारी अजून नक्कीच झालेली नाही. अशातच निवडणूक आयोगाचे नवीन आदेश आले तर काय सांगावे? दुसरा पर्याय मग सप्टेंबर ऑक्टोबर चा. कारण त्यावेळी प्रशासकाचा सहा महिन्याचा कालावधी देखील पूर्ण होईल. शिवाय पावसाळा ही संपला असेल. मग राज्य सरकार याआधी जेव्हा निवडणूक घ्यायची म्हणत होते, तेव्हाच होणार असे दिसते. कोर्टाच्या याचिकेचातसा फार फायदा झाला, असे म्हणता येत नाही.
पण या झाल्या जर तर च्या गोष्टी. पण निवडणूक कधी लागणार, याबाबतची संदिग्धता मात्र तशीच आहे!
COMMENTS