TA : PMC : महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता सुधारित दराने

HomeपुणेBreaking News

TA : PMC : महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता सुधारित दराने

Ganesh Kumar Mule May 12, 2022 6:39 AM

Scrap Vehicles : PMC : बेवारस गाड्याने  बालेवाडीचे गोडाऊन ‘फुल्ल’!  : पाषाण ला नवीन गोडाऊन करणार 
PMC : River Devlopment : नदी सुधार साठी महापालिका ७०० कोटी खर्च करणार
Salary paid to municipal employees | उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनपा कर्मचाऱ्यांना दिले वेतन | कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण  | मात्र पहिल्या हफ्त्याची वाट अजून दूरच 

महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता सुधारित दराने

: महापालिका प्रशासनाने सुरु केली अंमलबजावणी

पुणे :  सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे वित्त विभागाकडील शासन निर्णय नुसार  राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-याना दिनांक १ एप्रिल २०२२ पासून वाहतुक भत्यांच्या दरामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा केली आहे. त्यानुसार महापालिका कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. महापालिका प्रशासनाने त्याची अंमलबजावणी देखील सुरु केली आहे. चालू वेतनातच ही रक्कम अदा केली जाणार आहे.

एस -१ ते एस-६ या वेतन स्तर मधील रू.२४,२००/- व त्यापेक्षा जास्त वेतन आर्हरित  करणा-या बृहन्मुंबई नागरी समुह,नागपुर नागरी समुह व पुणे नागरी समुह मधील कार्यरत कर्मचा-यांना रू.२७००/- व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचा-यांना रू.१३५०/- इतका वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील. निर्णयानुसार अंध,अस्थिव्यंगाने अधु आणि मणक्याच्या विकाराने पिडीत असणा-या तसेच मुकबधिर/श्रवण शक्तितील दोष असणा-या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना सध्या अनुज्ञेय
असणा-या वाहतुक भत्यामध्ये पुढील प्रमाणे वाढ करण्यात आली आहे. अंध,अस्थिव्यंगाने अधु आणि मणक्याच्या विकाराने पिडीत असणा-या तसेच मुकबधिर/श्रवण शक्तितील
दोष असणा-या उपरोक्त एस-१ ते एस-६ या वेतन स्तर मधील रू. २४,२००/- व त्यापेक्षा जास्त वेतन आर्हरित करणा-या बहन्मुंबई नागरी समुह,नागपुर नागरी समुह व पुणे नागरी समुह मधील कार्यरत कर्मचा-यांना रू. ५४००/- व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचा-यांना रू.२७००/- इतका वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील..

अशा असतील अटी

पुणे महानगरपालिकेचा समावेश पुणे नागरी समुहामध्ये होत आहे.त्यामुळे पुणे महानगरपालिकेतील अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन स्तरमधील वेतन विचारात घेउन उपरोक्त संदर्भ क्र १ चे शासन निर्णयात पुणे नागरी समुहाकरीता नमुद केले प्रमाणे सुधारीत वाहतुक भत्ता दि. ०१/०४/२०२२ खालील अटी व शर्तीचे अधिन राहुन मंजुर करण्यात येत आहे.
१. कर्तव्यस्थानापासून १ किलोमीटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात पुणे महानगरपालिकेच्या निवासस्थान पुरविण्यात आलेल्या कर्मचा-यांना हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
२. ज्या कर्मचा-यांना पुणे महानगरपालिकेच्या वाहतुक सुविधा पुरविण्यात आली आहे त्यांना हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.तसेच वाहतुक भत्यांचे प्रदान करण्यासंदर्भात इतर विदयमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील
३. रजा,प्रशिक्षण,दौरा इत्यादी कारणांमुळे संपूर्ण कॅलेडर महिन्यात अनुपस्थित असल्यास त्या महिन्यात हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही. सुधारीत दराने वाहतुक भत्ता माहे एप्रिल २०२२ चे वेतनात अदा करण्यात यावा. मे. राज्य शासनाकडील संदर्भ क्र. १ चे ज्ञापनानुसार पुणे महानगरपालिकेतील अधिकारी/सेवकांना दिनांक ०१.०४.२०२२ पासून सुधारीत दराने वाहतुक भत्ता आदा करणेस मा. महापालिका आयुक्त यांनी संदर्भ क्र.२ चे ठरावान्वये मान्यता दिली आहे.
वरील मान्यतेनुसार माहे एप्रिल २०२२ चे बिलामधून रक्कम आदा कराताना दरमहाच्या वाहतुक भत्त्याचा खर्च खात्याचे वेतन विषयक तरतूदीमधून करण्यात यावा. या कामी सुधारीत दराने वाहतुक भत्यांची नोंद सेवापुस्तकत ठेवण्यात यावी.