P. Chidambaram : TMV : लोकमान्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र कोणीही हिरावून घेऊ शकत नाही : पी. चिदंबरम यांचे प्रतिपादन

HomeBreaking Newsपुणे

P. Chidambaram : TMV : लोकमान्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र कोणीही हिरावून घेऊ शकत नाही : पी. चिदंबरम यांचे प्रतिपादन

Ganesh Kumar Mule May 06, 2022 2:48 PM

 Pune Municipal Corporation’s (PMC) 42nd Fruits, Flowers and Vegetables Competition and Exhibition on 10th and 11th February!
DA Hike | अर्धा ऑक्टोबर उलटला… महागाई भत्ता कुठे आहे? अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA देण्यास विलंब का?
Governor Ramesh Bais | राज्यातील शाळांचे गुणवत्तेनुसार श्रेणीकरण करणे महत्वाचे | राज्यपाल रमेश बैस

लोकमान्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र कोणीही हिरावून घेऊ शकत नाही

: पी. चिदंबरम यांचे प्रतिपादन

 : टिमविचा वर्धापन दिन साजरा

अद्ययावत प्रॉडक्शन कंट्रोल रूम आणि ब्रॉडकास्ट रूमचा शुभारंभ

पुणे : लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हे चतुःसूत्री मांडून देशाला स्वातंत्र मिळवून दिले आहे. जन्मतः जगण्याचे स्वातंत्र असल्याचे महत्व त्यांनी पटवून दिले. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये बोलण्याचा, आंदोलन करण्याचा व मते मांडण्याचा अधिकार उरला आहे, का?  असा सवाल उपस्थित करीत आपले स्वातंत्र कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे  प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या 101 व्या वर्धापन दिनानिमित्त मास कम्युनिकेशन विभागामध्ये अद्ययावत प्रॉडक्शन कंट्रोल रूम आणि ब्रॉडकास्ट रूमचा शुभारंभ माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या हस्ते शुक्रवारी झाला.  अत्याधुनिक प्रॉडक्शन रूम आणि ब्रॉडकास्ट दालनाचे उदघाटन चिदंबरम यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाचा 100 वर्षांच्या वाटचालीचा ग्रंथाचे प्रकाशन यावेळी त्यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, प्रभारी कुलगुरु डॉ. गीताली टिळक मोने, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅड. संतोष शुक्ला, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. प्रणति रोहित टिळक, सचिव अजित खाडिलकर यावेळी उपस्थित होते.

पी. चिदंबरम म्हणाले, लोकमान्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आधिकार असल्याचे इंग्रजांना ठणकावून सांगितले होते. स्वातंत्र्याशिवाय आपण काहीच साध्य करु शकत नाही, हे त्यांना माहित होते. सहा दशकाच्या आयुष्यात ते भारतीय जनमाणसाचे ते जननायक बनले होते. लोकमान्यांची स्मृतीशताब्दी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, की आपण स्वातंत्र स्वीकारले पाहिजे. प्रत्येक दिवशी आपण गमावलेल्या स्वातंत्र्याचा अनुभव आपण घेत असून सध्या आपले स्वातंत्र हिरावून घेतले जात आहे. लिहीणे, एकत्र जमणे, तसेच बोलण्याचा स्वतंत्र  हिरावले जात आहे. आपण जन्मतः स्वातंत्र असून ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असेही यावेळी पी. चिंदबरम यांनी सांगितले.

आमच्या मुलभूत अधिकारावर कोणीही गदा आणू शकत नाही. आजपर्यंत हजारो वर्षांपासून राजे, सरकार अवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. आमचा आवाज कोणीही दाबू शकत नाही, असेही यावेळी पी. चिंबरम यांनी स्पष्ट केले. आणखी लाखो लोकांना या देशात शिक्षण, आरोग्यसेवा मिळत नाही. त्यांच्या अधिकाराबद्दल त्यांना कल्पनादेखील नाही. या वंचितांना आरोग्य, शिक्षण त्यांचे अधिकार मिळवून देणे हे आपले कर्तव्य असून त्यांना अधिकार मिळवून दिला पाहिजे. राजकीय आणि निवडणूकीचे स्वातंत्र्य आहे. मात्र खरं स्वातंत्र्य हे गरीबी, अन्याय बेरोजगारीपलीकडेदेखील असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.

डॉ. दीपक टिळक म्हणाले, ‘विद्यापीठाने गेल्या 100 वर्षांमध्ये अनेक महत्त्वाचे टप्पे पाहिले आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये विद्यापीठाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लोकमान्यांच्या विचारधारेवर विद्यापीठाची वाटचाल सुरु आहे. रोजगारभिमूख अभ्यासक्रमापासून ते अत्याधुनिक अभ्यासक्रमापर्यंत विद्यापीठात शिकविले जात आहे. विद्यापीठात कनिष्ठ महाविद्यालयाला परवानगी मिळाली असून एलएलएम व फिजिओथेरपीची पदव्युत्तर पदवीचे अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

याप्रसंगी डॉ. गीताली टिळक-मोने यांनी विद्यापीठाच्या विविध विभागाचा कार्याचा आढावा घेतला.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ स्पोर्स्टस् लिग वर्ल्ड बुक ऑफ रेकार्डमध्ये नोंद झाल्यानिमित्त वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅड. संतोष शुक्ला यांच्या हस्ते विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0