Pune NCP : Prashant Jagtap : राष्ट्रवादी ओ.बी.सी ना सर्वसाधारण कोट्यातून त्यांच्या वाट्याची तिकिटे देणार 

HomeपुणेBreaking News

Pune NCP : Prashant Jagtap : राष्ट्रवादी ओ.बी.सी ना सर्वसाधारण कोट्यातून त्यांच्या वाट्याची तिकिटे देणार 

Ganesh Kumar Mule May 05, 2022 5:27 AM

Congress : NCP : कॉंग्रेसच्या माजी स्थायी समिती अध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश 
Loksabha election 2024 Mahayuti | लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार! | चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार
Sharad Pawar | Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यासाठी आता माझा एककलमी कार्यक्रम | शरद पवार

राष्ट्रवादी ओ.बी.सी ना सर्वसाधारण कोट्यातून त्यांच्या वाट्याची तिकिटे देणार

:  रष्ट्र्वादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचे आश्वासन

पुणे : कोर्टाने जरी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे जाहीर केले असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार पुणे शहरात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तिकीट वाटपात ओ.बी.सी बंधु भगिनींना सर्वसाधारण कोट्यातून त्यांच्या वाट्याची तिकिटे देणार आहेत. ओ.बी.सी बांधवांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ न देण्याची काळजी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी घेईल. असे आश्वासन पुणे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिले आहे.

: पार्टी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज

जगताप म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्य निवडणूक आयोगास ओ.बी.सी आरक्षणाशिवाय दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सर्वप्रथम सन्माननीय सुप्रीम कोर्टाचा आम्ही आदर करतो. अर्थात अशा प्रकारचा निर्णय होणे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीला अपेक्षित नव्हते. महाराष्ट्रातील ओ.बी.सी बांधवांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आग्रही भूमिका होती, आहे आणि यापुढेही राहील. ओ.बी सी बांधवांना निवडणुकीतील राजकीय आरक्षण मिळावे यासाठी आमची सुरू असणारी लढाई यापुढे देखील सुरूच राहणार आहे. परंतु कोर्टाच्या निर्णयाचा मान राखत असताना निवडणुका कधी घ्यायच्या याबाबतचे सर्व अधिकार राज्य निवडणूक आयोगाचे आहेत. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने तत्काळ निवडणुका जाहीर केल्या, तर पुणे शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज आहे. असे ही जगताप म्हणाले.