Akshay tritiya : श्री लक्ष्मी माता उत्सवानिमित्त मंदिरात फळांची आरास

Homeपुणेcultural

Akshay tritiya : श्री लक्ष्मी माता उत्सवानिमित्त मंदिरात फळांची आरास

Ganesh Kumar Mule May 03, 2022 3:02 PM

Aba Bagul News | निलंबन केले असल्यास ते तातडीने मागे घ्यावे! |काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे आबा बागुल यांची मागणी
PMC : Aba Bagul : महानगरपालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या मानधनाचा मार्ग मोकळा : कॉंग्रेस गटनेते  आबा बागुल यांची माहिती 
Prabhag NO 19 | श्री संत संताजी महाराज जगनाडे उद्यानाचे लोकार्पण 

अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी शिवदर्शन वसाहतीच्या श्री लक्ष्मी मातेचा उत्सव पुण्यनगरीचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पुढाकारातूनदरवर्षी विविध उपक्रमातून हा मातेचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो.

श्री लक्ष्मी माता उत्सवानिमित्त शिवदर्शन येथील मंदिरात फळांची आरास करण्यात आली होती. संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंदिराच्या गाभाऱ्यात मोगऱ्याच्या फुलांची विशेष सजावट करण्यात आली होती.

सकाळी 9 वाजता मा.आबा बागुल यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला असून संध्याकाळी पालकी सोहळा संपन्न झाला या वेळी मंदिराचे ट्रस्टी नंदकुमार बानगुडे,घनश्याम सावंत,नंदकुमार कोंढाळकर,रमेश भंडारी, अमित बागुल, हेमंत बागुल व शिवदर्शन वसाहतीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 2