उन्हाळ्या निमित्त महापालिकेची पुणेकरांना पर्वणी
: आजपासून उद्यानांचे वेळेत बदल
पुणे : महापालिकेने उन्हाळ्या निमित्त पुणे शहरातील नागरिकांना भेट दिली आहे. महापालिकेने उद्यानांचे वेळेत बदल केला आहे. सद्यस्थितीत
उद्यानांची वेळ सकाळी ६.०० ते १०.०० व सायंकाळी ४.०० ते ८.०० अशी होती. ती आजपासून ते १५ जूनपर्यंत सकाळी ६.०० ते सकाळी ११.०० व सायंकाळी ४.०० ते ९.०० अशी असेल. महापालिकेच्या उद्यान विभागाने याबाबतचे आदेश लागू केले आहेत.
महाराष्ट्र मनपा अधिनियम कलम ६६(१०) अन्वये सार्वजनिक उद्याने, बागा, मनोरंजनासाठी मोकळ्या जागांची तरतूद करणे, नागरिकाच्या मनोरंजनासाठी उद्याने/बागा उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. पुणे महानगरपालिका अधिकार क्षेत्रामध्ये उद्यान विभागामार्फत एकूण २०५ उद्याने ,मत्सालय व प्राणी संग्रहलाय विकसित केलेली असून या उद्यानाचे विकसन, सुशोभिकरण, देखरेख, देखभाल व दुरुस्ती विषयक कामे उद्यान विभागामार्फत करण्यात येतात. सदर उद्यानांमध्ये नागरिक/लहान मुले,परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात. पुणे शहारातील विविध उद्यानांना प्रवेशशुल्क असल्याने त्याद्वारे पुणे महानगरपालिकेस मोठ्या प्रमाणावर उत्पन्न प्राप्त होत आहे.
१५ मार्च २०१९ पासून करोनाचा प्रार्दूभाव रोखणेसाठी पुणे शहरातील उद्याने नागरिकांसाठी बंद करण्यात आलेली होती. तदनंतर ब्रेक द चैन अंतर्गत टप्प्याने अटी व शर्तीसह उद्याने सुरू करण्यात आलेली आहेत व सद्यस्थितीत दि.१ मार्च २०२२ पासून पुणे महानगरपालिका अधिकार क्षेत्रांतील सर्व उद्याने पुर्ववत सुरू करण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीत
उद्यानांची वेळ सकाळी ६.०० ते १०.०० व सायंकाळी ४.०० ते ८.०० अशी आहे. सद्यस्थितीत उन्हाळा सुरू असून नागरिक/लहान मुले सायंकाळच्या वेळी उद्यानांमध्ये येत मोठ्या प्रमाणात फिरावयास येत असतात. त्या पार्श्वभुमीवर नागरिकांकडून उद्यानांची वेळ वाढविणेबाबत मागणी होत आहे. त्यानुसार उन्हाळ्या निमित्ताने ९ एप्रिल २०२२ ते १५ जुन २०२२ या कालावधीकरिता खालील प्रमाणे उद्यानांच्या वेळा वाढविण्यात येत
आहे.
→ उद्याने- सकाळी ६.०० ते सकाळी ११.०० व सायंकाळी ४.०० ते ९.००
→ मत्सालय – सकाळी ८.०० ते सकाळी ११.०० व सायंकाळी ४.०० ते ९.००
तरी सर्व उद्यान अधिक्षक/हॉर्टीकल्चर सुपरवायझर/हॉर्टीकल्चर मिस्त्री यांनी त्यांच्या अखत्यारित असलेल्या उद्यानांमधील कार्यरत सेवक/सुरक्षारक्षक यांना याबाबतच्या सुचना देवून उद्यानांच्या वेळेत करण्यात आलेल्या बदला बाबतचा फलक उद्यानांच्या प्रवेशद्वारावर लावणेत यावा. असे आदेशात म्हटले आहे.
COMMENTS