PM Modi pune Tour : Prashant Jagtap : पुणे, पिंपरी मनपा हातातून जाणार म्हणून मोदींना पाचारण 

HomeBreaking Newsपुणे

PM Modi pune Tour : Prashant Jagtap : पुणे, पिंपरी मनपा हातातून जाणार म्हणून मोदींना पाचारण 

Ganesh Kumar Mule Mar 03, 2022 4:11 PM

MLA Ravindra Dhangekar Vs Dheeraj Ghate | आमदार रवींद्र धंगेकर हवेने भरलेला फुगा | धीरज घाटे यांची टीका 
Vidhansabha Election Results | तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी | धीरज घाटे
Chitra Wagh | महिला मोर्चा ने सामान्य नागरिकांसाठी झटले पाहिजे | चित्रा वाघ

पुणे, पिंपरी मनपा हातातून जाणार म्हणून मोदींना पाचारण

: राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा भाजपला टोला

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पानिपत होणार आहे याची चाहूल लागताच भाजपच्या वतीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाचारण करण्यात येत आहे. असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस  चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपला लगावला आहे.

जगताप म्हणाले, अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची एकही संधी स्वतः नरेंद्र मोदींनीही सोडली नाही. छत्रपतींच्या महाराष्ट्राने देशाला कोरोना दिला असे वक्तव्य करत त्यांनी छत्रपतींच्या स्वराज्याचा अवमान केला. संघाचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केला. ही ‘छिंदम’ प्रवृत्ती भाजप आणि आरएसएस च्या नसानसांत भिनलेली आहे. असे असतानाही मतांचे राजकारण करण्यासाठी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आणि प्रतिमेचा आवर्जून वापर भाजपकडून होतो.

जगताप पुढे म्हणाले,  महानगरपालिका आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदींचं व्यक्तिमत्त्व उठून दिसावं, त्यांची बडदास्त ठेवता यावी म्हणून हा कार्यक्रम केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत करण्याचा भाजपचा डाव आहे. पुणे जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे, पुणे शहरात शिवरायांचं बालपण गेलं, असं असताना पुतळ्याचे अनावरण भव्यदिव्य सोहळ्यात होणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता केवळ नरेंद्र मोदी व भाजप यांच्यापुरता हा सोहळा मर्यादित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
हा शिवद्रोह आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही येत्या ६ मार्च रोजी याचा तीव्र निषेध करणार आहोत याची भारतीय जनता पक्षाने नोंद घ्यावी.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0