Pune Congress Vs Kirit somaiya : सोमय्यांच्या जंगी स्वागताला काँग्रेसचा विरोध  : महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे दिला इशारा 

HomeपुणेBreaking News

Pune Congress Vs Kirit somaiya : सोमय्यांच्या जंगी स्वागताला काँग्रेसचा विरोध  : महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे दिला इशारा 

Ganesh Kumar Mule Feb 10, 2022 3:03 PM

PMC JICA Project | ९ वर्षे होऊनही जायका प्रकल्प पुरा होईना!
Pune City BJP Jumbo executive | पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर | वर्षा तापकीर, मंजूषा नागपुरे, रुपाली धाडवे, स्वरदा बापट यांच्या खांद्यावर मोठ्या जबाबदाऱ्या
Ink Attack | पालकमंत्र्यांवरील शाईहल्ल्याविरोधात पुणे भाजपकडून निषेध आंदोलन !

सोमय्यांच्या जंगी स्वागताला काँग्रेसचा विरोध

: महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे दिला इशारा

पुणे : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या(Kirit somaiya)  यांना मागील आठवडयात महापालिकेत (pune municipal corporation) शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली होती. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील सत्ताधारी भाजपने(BJP)  शुक्रवारी म्हणजेच उद्या महापालिकेत सोमय्या यांचा ज्या ठिकाणी ही घटना झाली त्याच ठिकाणी दुपारी ३:३० वाजता जंगी स्वागत करणार असल्याची घोषणा केली आहे. या कार्यक्रमास शहर कॉंग्रेसने(pune congress)  विरोध केला असून या कार्यक्रमास महापालिकेने परवानगी दिल्यास त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष रमेश बागवे आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्राद्वारे महापालिका आयुक्तांना दिला आहे.

 

या पत्रानुसार, शहराच्या परंपरेनुसार पुणे महानगरपालिकेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना परवानगी दिली जात नाही. पुणे महानगरपालिकेमध्ये फक्त जनतेच्या हिताचे उपक्रम आणि महानगरपालिकेच्या कार्यक्रमांनाच परवानगी दिली जाते. जर पालिका प्रशासनाने भारतीय जनता पक्षाला माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला परवानगी दिली तर त्या ठिकाणी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1