Kirit Somaiya : सोमय्या हे व्हीलचेअरवरून थेट पुणे महापालिकेत!   : जम्बो कोविड सेंटर ची केली तक्रार

HomeBreaking Newsपुणे

Kirit Somaiya : सोमय्या हे व्हीलचेअरवरून थेट पुणे महापालिकेत! : जम्बो कोविड सेंटर ची केली तक्रार

Ganesh Kumar Mule Feb 06, 2022 6:01 AM

Jumbo Covid Centre : २८ फेब्रुवारीनंतर जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय
Jumbo Covid Center : Mahavikas Aghadi : Thackrey Govt : पुण्याच्या जम्बो सेंटर वरून देखील ठाकरे सरकार ‘टार्गेट’! 
Jumbo Covid Center : जम्बो कोविड सेंटर बाबत विभागीय आयुक्त कार्यालयाने केला ‘हा’ खुलासा

सोमय्या व्हीलचेअरवरून थेट पुणे महापालिकेत!

: जम्बो कोविड सेंटर ची केली तक्रार

पुणे : भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somayya) शनिवारी पुणे महापालिकेत गेले असता शिवसैनिकांशी झालेल्या झटापटीत  जखमी झाले होते. यानंतर सोमय्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सोमय्या हे व्हीलचेअरवरून थेट पुणे महापालिकेत दाखल झाले. त्यांनी महापालिकेत जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रार केली आहे. मात्र यामुळे आता महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. दरम्यान सुट्टीच्या दिवशी सोमय्या पालिकेत का जातात, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

सोमय्यांना काल झालेल्या प्रकारानंतर संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. हाताला बँडेज लावलेल्या अवस्थेत व्हीलचेअरवरून सोमय्या आज सकाळीच रुग्णालयातून थेट पुणे महापालिकेत पोचले. कालचा प्रकार लक्षात घेता सोमय्यांच्या झेड सुरक्षेसोबत आज मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली होती. सोमय्यांनी जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहाराची तक्रार केली आणि लगेच ते तिथून निघून गेले.


सोमय्या हे काल महापालिकेत आले असतानाता शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. संतापलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या कारच्या काचांवर हाताने ठोसे मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. मात्र आक्रमक शिवसैनिकांशी झालेल्या झटापटीत किरीट सोमय्या अक्षरश: महापालिकेच्या पायऱ्यांवर पडले. किरीट सोमय्याच्या सुरक्षारक्षकांनी शिवसैनिकांना बाजूला करत त्यांना बाहेर काढले. दरम्यान, यावेळी झालेल्या झटापटीमुळे महापालिकेच्या आवारात चांगलाच गोंधळ उडाला होता.

या झटापटीत जखमी झाल्याने किरीट सोमय्या यांना संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संचेतीमध्ये जाऊन सोमय्यांची विचारपूस केली होती. यानंतर सोमय्यांनी ट्विट करत शिवसैनिकांवर निशाणा साधला होता. पुणे महापालिकेच्या आवारात शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर आरोप केला आहे. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी सोमय्या हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर ते पुणे महानगरपालिकेत पत्रकार परिषदही घेणार होते. मात्र, महापालिकेत गोंधळ झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0