Pune : Cool Weather : पुण्याचे तापमान 10 अंश सेल्सियस च्या खाली   : शिवाजीनगर, पाषाण ला सर्वात कमी तापमानाची नोंद

HomeपुणेBreaking News

Pune : Cool Weather : पुण्याचे तापमान 10 अंश सेल्सियस च्या खाली : शिवाजीनगर, पाषाण ला सर्वात कमी तापमानाची नोंद

Ganesh Kumar Mule Jan 27, 2022 4:05 AM

Howard Scholar Dr. Suraj Engde | गर्दीच्या मानसिकतेतून बाहेर पडा, स्वतःचे अस्तित्व निर्माण करा – हॉवर्ड स्कॉलर डॉ. सुरज एंगडे
Mohan Joshi | कसब्यातील काँग्रेसच्या विजयामुळेच झुकला भाजप | मोहन जोशी
Misbehavior in the subway | भुयारी मार्गामध्ये होणाऱ्या गैरप्रकारा विरोधात युवक राष्ट्रवादी चे कोथरूड पोलिस व महापालिकेस निवेदन

पुण्याचे तापमान 10 अंश सेल्सियस च्या खाली

: शिवाजीनगर, पाषाण ला सर्वात कमी तापमानाची नोंद

पुणे : महाराष्ट्र थंडीने गारठला आहे. पुण्यातही गेल्या आठवड्यापासून बोचऱ्या थंडीची लाट आली आहे. गेल्या दोन तीन दिवसापासून पुण्याचे तापमान 10 अंश सेल्सियस च्या खाली आले आहे. आज म्हणजे 27 जानेवारीला पाषाण 8.9, शिवाजीनगर 9.8, NDA 9.4 अशा तापमानाची नोंद झाली आहे.

: आगामी 24 तासांत अजून महाराष्ट्र गारठणार

पुण्याचे तापमान गोठत असताना महाराष्ट्रातही हीच स्थिती दिसून येते आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 24 तासांत थंडी अजून वाढणार आहे. याबाबत नागरिकांना दक्ष राहावे लागणार आहे. खास करून मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा कडाका वाढणार आहे. इकडे पुणे जिल्हा देखील चांगलाच गारठून गेला आहे. हवामान विभागाचे संशोधक के एस होसाळीकर यांनी शहर आणि जिल्ह्यातील तापमान कसे कमी झाले ते सांगितले आहे.

: असे आहे तापमान

शिवाजीनगर : 9.8
पाषाण   : 8.9
NDA  : 9.4
हवेली  : 9.1
माळीण : 9