महंमदवाडी-कौसरबाग परिसरात उभे राहणार मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल
: स्थायी समितीची मान्यता
पुणे : प्रभाग क्र. २६ महंमदवाडी -कौसरबाग (महंमदवाडी) येथील स.नं.३६ या ठिकाणी पीपीपी तत्वावर पुणे महानगरपालिकेचे मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल उभे केले जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली आहे. यामुळे परिसरात नागरिकांना चांगली सुविधा मिळणार आहे. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
: पीपीपी तत्वावर उभारणी
नगरसेविका प्राची आल्हाट व नंदा लोणकर यांनी प्रस्ताव दिला होता. त्यानुसार प्रभाग क्र. २६ महंमदवाडी-कौसरबाग (महंमदवाडी) येथील स.नं.३६ या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात हॉस्पिटल आरक्षित असलेली अॅमेनिटीस्पेस आहे. जागा हि पीपीपी तत्वावर ३० वर्षासाठी देण्यात यावी. यामुळे महंमदवाडी कौसरबाग येथील नागरिकांसाठी एक चांगल्या प्रकारचे रुग्णालय स्थापन झाल्यास तेथील नागरिकांना या रूग्णालयाचा फायदा होईल. तसेच महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल याबाबत प्रस्ताव दिला होता. त्यावर स्थायी समितीने अभिप्राय मागविला होता. प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिला आहे. त्यानुसार प्रभाग क्र. २६ महंमदवाडी – कौसरबाग (महंमदवाडी) येथील परीसरामध्ये पुणे मनपाचे कोणतेही मोठे रूग्णालय नाही. सदरची जागा १४०० चौ.मी असून सदर जागेत सुमारे ४०००० चौ.फुट बांधकामशकते. त्या जागेमध्ये मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल उभे करता येऊ शकते. मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटलमधील वैदयकिय सेवा शासकिय दरामध्ये उपलब्ध करून दिल्यास महंमदवाडी कौसरबाग या परीसरातील गोर गरीब रुग्णांना याचा फायदा होऊ शकेल. हॉस्पिटल पीपीपी तत्वावर उभे केल्यास पुणे मनपास कोणतीही आर्थिक तोशिष लागणार नाही. प्रकल्पाचे बांधकाम , सर्व वैदयकिय साधन सामुग्री, मनुष्यबळ पुरविणे व त्यांचे वेतन भत्ते ही सर्व जबाबदारी पीपीपी तत्वावर निविदेमध्ये पात्र होणा-या निविदाधारकाची असणे योग्य होईल. तरी प्रभाग क्र. २६ महंमदवाडी -कौसरबाग (महंमदवाडी) येथील स.नं.३६ या ठिकाणी पीपीपी तत्वावर पुणे महानगरपालिकेचे मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल उभे करणे शक्य होईल. या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
COMMENTS
अभ्यास कमी पडतोय रुग्णालय आहे बगा माहिती घ्या