Navale Bridge : NHAI :  police : PMC : नवले पूल भागात उपाययोजनांना सुरुवात :  NHAI, पोलीस, महापालिका अधिकारी यांची महापौरांनी घेतली बैठक

HomeपुणेBreaking News

Navale Bridge : NHAI : police : PMC : नवले पूल भागात उपाययोजनांना सुरुवात : NHAI, पोलीस, महापालिका अधिकारी यांची महापौरांनी घेतली बैठक

Ganesh Kumar Mule Jan 17, 2022 4:34 PM

‘Streets for People’ : Pune : ‘स्ट्रीट्स फॉर पीपल’मध्ये पुणे शहराची बाजी – पुणे शहराचा राष्ट्रीय पातळीवर गौरव
Murlidhar Mohol Vs Prashant Jagtap | मुरलीधर मोहोळ यांनी केली फडणवीसांची पोलखोल | प्रशांत जगताप | जलसंपदा खात्याच्या चुकीमुळे पुणे शहर पाण्यात | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आक्रमक
Pune Flood News | केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा

नवले पूल भागात उपाययोजनांना सुरुवात : महापौर मोहोळ

– NHAI, पोलीस, महापालिका अधिकारी यांची महापौरांनी घेतली बैठक

पुणे : वारंवार अपघात होणाऱ्या नवले पूल आणि परिसरात उपाययोजनांना सुरुवात झाली असून या कामात तातडीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि दीर्घकालीन उपाययोजना अशा दोन्ही टप्प्यांवर काम सुरु झाले आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. दिशादर्शक फरक वाढवण्यापासून तर सर्व्हिस रोड बांधेपर्यंतची कामे या उपाययोजनांमध्ये करण्यात येणार असून कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी महापौर मोहोळ लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत.

नवले पूल आणि एकूणच शहरतून मुंबई-बंगलोर महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात महापौर मोहोळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजक केले होते. बैठकीला महामार्ग प्राधिकरणचे मुख्य प्रकल्प अधिकारी रामचंद्र राव, प्रकल्प अधिकारी एस.एस कदम, सल्लागार भारत तोडकरी, राकेश कोरी, आयुक्त विक्रम कुमार, महामार्ग प्राधिकरणचे उपव्यवस्थापक अंकित यादव, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, पथ अभियंता व्ही.जी. कुलकर्णी, वाहतूक व्यवस्थापक निखिल मिजार आदी उपस्थित होते.

बैठकीबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘महामार्ग प्राधिकरणच्या वतीने दिशादर्शक आणि माहितीफलक लावण्यास सुरुवात झाली असून यात ताशी ६० किमी, तीव्र उतार, हळू जा, अशा फलकांचा समावेश आहे. तुटलेल्या क्रॅश बॅरिअर्सची कामेही हाती घेण्यात आली आहेत. धोकादायक ठिकाणे निश्चित करुन त्या भागात रंबल स्ट्रीप पट्टेही बसविले जात आहेत. त्या सोबतच कॅट आय, रिफ्लेकटिंग बोर्ड आणि सोलर ब्लिनकिंग बसविण्यात आले असून पथदिवेही बसविण्यात येत आहेत’

संपूर्ण महामार्गालगत सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी महिमार्ग प्राधिकरण आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात करण्यात आली आहे. शिवाय नवले पुलाखाली असलेली अतिक्रमणे काढून त्यानंतर महामार्ग प्राधिकरण सर्व्हिस रोड दुरुस्ती करणार आहे. नव्या कात्रज बोगद्यानंतर आणि दरीपुलाजवळ गॅन्ट्री तयार करुन कायमस्वरूपी स्पीडगन आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही पोलीस आणि महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. नर्हे स्मशानभूमीसंदर्भात स्थानिक नागरिकांशी चर्चा करुन निर्णय होणार आहे. शिवाय सर्व्हिस रोड आणि महामार्गावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णयही घेतलाअसल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

महापौर मोहोळ पुढे म्हणाले, ‘अपघात रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी उपाययोजना करत असून सदरील उपाययोजना वेगाने आणि दर्जेदार करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी महापालिकेच्या बाजूने पूर्ण क्षमतेने काम करत आहोत. सर्व उपाययोजना संयुक्तिकरित्या होत असल्याने त्या नक्कीच प्रभावी आणि परिणामकारक असतील, यात शंका नाही’.

◆कायमस्वरूपी उपाययोजना…

– भूमकर चौक ते नवले पूल आणि विश्वास हॉटेल चौक या दोन ठिकाणी अंडरपास करण्यात येणार
– विश्वास हॉटेल चौक ते पासलकर चौक आणि नवलेपुलाच्या वडगाव बाजूचा सर्व्हिस रस्ता रुंदीकरण करणे
– सिंहगड रस्ता ते मुंबई बायपासला जाण्यासाठी आणि महामार्गावरुन सिंहगड रस्त्याला जाण्यासाठी क्लोव्हर लिफ जंक्शनचे विकसन करण्यासाठी डीपीआर तयार करण्यात येणार