Corona Vaccination: बूस्टर डोसनंतरही लसीचा डोस घ्यावाच लागणार; राज्याच्या टास्क फोर्स प्रमुखांनी स्पष्टच सांगितलं

HomeBreaking Newsमहाराष्ट्र

Corona Vaccination: बूस्टर डोसनंतरही लसीचा डोस घ्यावाच लागणार; राज्याच्या टास्क फोर्स प्रमुखांनी स्पष्टच सांगितलं

Ganesh Kumar Mule Jan 16, 2022 3:42 AM

School First Day | बाल विकास मंदिर शाळेत नवागतांचे स्वागत
Dr Kumar Vishwas | Pune Book Festival | पुस्तकांचे वाचन हा स्वसंवादाचा उत्तम मार्ग | प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास यांचे मत
Pune Metro Trial Run | पुणे मेट्रोची रुबी हॉल स्थानक ते रामवाडी स्थानकापर्यंत “ट्रायल रन” पूर्ण

बूस्टर डोसनंतरही लसीचा डोस घ्यावाच लागणार

: राज्याच्या टास्क फोर्स प्रमुखांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती होत आहे. या निमित्ताने वैद्यकीय तज्ज्ञांनी पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधक लस हे कोरोनाविरोधातील प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला प्राधान्य द्यावे, असे म्हटले आहे. या विषाणूत जनुकीय बदल होत असल्याने त्याप्रमाणे लसीमध्येही बदल होतील, असेही डॉक्टरांनी नमूद केले आहे.

राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, यापूर्वी  स्वाइन फ्लू, सार्स कोविड या आजारांतही विषाणूचे म्युटेशन होत राहते. त्याप्रमाणे कोविडच्या बाबतीतही दर सहा महिन्यांनी किंवा एक वर्षाने लस घ्यावी लागणार आहे. ज्या ठिकाणी या विषाणूचा प्रसार अधिक आहे किंवा जे घटक संसर्गाच्या दृष्टीने अतिजोखमीच्या गटात येतात अशा व्यक्तींना लसीकरणात प्राधान्य देण्यात येईल. आता कोरोनाची लाट आहे; परंतु ज्यावेळी एन्डेमिक म्हणजेच अंतर्जन्य आजार होईल, तेव्हा लसही बदलेल, जुनी लस उपयुक्त ठरणार नाही. राज्यात पहिल्या टप्प्यात चांगले लसीकरण झाले. लहानग्यांसाठी तोंडावाटे देण्यात येणारा लसीचा डोस आला तर त्यात आपण लगेच गती पकडू शकतो. बूस्टर डोसविषयी अजूनही सामान्यांची मानसिकता सकारात्मक नाही, कोरोना गेला आहे अशा भ्रमात सर्व आहेत. तसे न करता ही मात्रा घ्यायला हवी.

: लसीकरण आणि कोरोनाचा धोका

लसीमुळे कोरोना होत नाही हा गैरसमज बाळगणे चुकीचे आहे. आता शास्त्रीय व वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे की, लसीकरणामुळे कोरोनाच्या आजाराची तीव्रता कमी होते. रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासत नाही किवा गंभीर स्वरूप घेत नाही, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.