Pune Fights Corona : शहरात कोरोना रुग्णांची वाढ कमी होईना : पुणेकरांच्या चिंतेत वाढ! 

HomeपुणेBreaking News

Pune Fights Corona : शहरात कोरोना रुग्णांची वाढ कमी होईना : पुणेकरांच्या चिंतेत वाढ! 

Ganesh Kumar Mule Jan 07, 2022 2:54 PM

Pune Municipal Corporation | बोपोडीत पुणे महानगरपालिकेची भूसंपादन कारवाई
The Secrets of the Millionaire Mind Book | “द सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड” पुस्तक म्हणजे संपत्ती आणि यशाचा मार्ग 
Atal Sanskriti Gaurav Purskar | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अटल संस्कृती गौरव पुरस्कारचे वितरण

पुणेकरांच्या चिंतेत वाढ!

: शहरात कोरोना रुग्णांची वाढ कमी होईना

पुणे :  कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. आज (शुक्रवार, ७ जानेवारी) पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल २ हजार ७५७ रुग्ण आढळले आहेत. एक आठवड्यांपुर्वी प्रतिदिन कोरोना रुग्णवाढ २०० च्या जवळपास होती. जी आज २ हजार ७५७ पर्यंत पोहचली आहे. आज दिवसभरात १८ हजार ८६ जणांनी कोरोनाची चाचणी केली होती. शहरातील पॉझिटिव्हिटी रेट ७.७१ वर आला आहे.

शुक्रवारी पुण्यात ६२८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १२४ वर गेली आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील कॉलेजेसही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहेत.

– दिवसभरात 2757 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 628 रुग्णांना डिस्चार्ज.
– 02 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
519535
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 9792
– एकूण मृत्यू – 9124
– एकूण डिस्चार्ज- 500616
– दिवसभरात झालेल्या टेस्ट्- 18086