PMC: BJP : ती बस : महिला बाल कल्याण समितीचा निर्णय स्थायी समितीने बदलला

HomeBreaking Newsपुणे

PMC: BJP : ती बस : महिला बाल कल्याण समितीचा निर्णय स्थायी समितीने बदलला

Ganesh Kumar Mule Jan 06, 2022 4:15 AM

Tender rights | PMC Pune | निविदा अधिकार सुपुर्तीबाबत महापालिका आयुक्तांचे महत्वपूर्ण आदेश | उपअभियंत्यांना १ लाखापर्यंत, कार्यकारी अभियंत्यांना १ लाख ते १० लाखापर्यंत निविदा काढण्याचे अधिकार
Property Survey | Devendra Fadnavis | सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
RTI system | महापालिकेच्या ऑनलाईन RTI प्रणाली मध्ये अडचणी | महापालिका NIC कडून करून घेणार निराकरण 

‘ती’ बस : महिला बाल कल्याण समितीचा निर्णय स्थायी समितीने बदलला 

: 11 महिन्याऐवजी 5 वर्ष दिले जाणार काम 

पुणे : पुणे शहरामध्ये महिलांकरिता ११ “ती” बस टॉयलेट कार्यरत आहेत.  स्वच्छ “ती” बसटॉयलेटमध्ये सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन, टॉयलेट सीट सॅनिटायझर, हॅन्ड सॅनिटायझर, जनजागृती विषयक माहिती देण्यासाठी टीव्ही इत्यादी सुविधा आहेत.  ‘ती” बस टॉयलेटची दैनंदिन देखभाल दुरूस्ती व अनुषंगिक कामे ११ महिने करिता प्रायोगिक तत्वावर करणेबाबत साराप्लास्ट यांचे समवेत करारनामा करण्यात आला होता. तो संपला असून नवीन करारनामा 5 वर्ष साठी करण्याबाबत प्रशासनाकडून महिला बाल कल्याण समिती समोर प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. समिती सदस्यांनी या बस ची पाहणी केली होती. तसेच प्रस्ताव मान्य करताना प्रशासनाचा प्रस्ताव जसाच्या तसा मान्य केला नव्हता. या बस च्या वापरासाठी पैसे न घेता आणि ठेकेदाराला 5 वर्ष ऐवजी 11 महिन्याच्या कराराने देण्यास मान्यता दिली होती. हा प्रस्ताव नंतर स्थायी समितीने मान्य देखील केला. मात्र या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा याला फेरप्रस्ताव देऊन महिला बाल कल्याण समितीचा निर्णय बदलत प्रशासनाचा आहे तसा प्रस्ताव मान्य केला. यामुळे सत्ताधारी भाजपमध्ये समन्वय नसल्याचे समोर आले आहे.


: प्रशासनाचा असा होता प्रस्ताव

 पीएमपीएमएलच्या वापरात न येणाऱ्या बसेस चे रुपांतर महिलांची गैरसोय होऊ नये याकरिता टॉयलेटमध्ये करण्यात आले. ‘ती” बस टॉयलेटची दैनंदिन देखभाल दुरूस्ती व अनुषंगिक कामे ११ महिने करिता प्रायोगिक तत्वावर करणेबाबत साराप्लास्ट यांचे समवेत करारनामा करण्यात आला होता. याबाबत पुणे महानगरपालिकेकडून ठेकेदाराला ( साराप्लास्ट ) कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही. सदर करारनामा यामध्ये धुण्याची मशीन, पाण्याची बाटली यांची विक्री करून देखभाल दुरूस्ती करणे इ. बाबींचा समावेश करण्यात आला होता . सदर एजन्सी बरोबरचे करारनामा दि. ५ सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात आला आहे. तसेच बाणेर येथील “ती” बस येथे वडापाव व समोसा विक्री करण्यात येत असल्या बद्दल आक्षेप घेण्यात आला होता.  २१/०२/२०२१ रोजी ऑनलाईन कोटेशन द्वारे ती बस टॉयलेटची देखभाल व दुरुस्ती करणेकरिता दर मागविण्यात आले असता मे. साराप्लास्ट प्रा. लि. व नारळे कन्सट्रक्शन्स या २ ठेकेदार यांनी अनुक्रमे र रु १८,०००/- व ३,६०,०००/- प्रति बस प्रती महिना याप्रमाणे प्राप्त झाले होते. या अनुषंगाने सद्यस्थितीत मे. साराप्लास्ट प्रा. लि. याचे सर्वात कमी दर असून सदरच्या कंपनीकडून देखभाल व दुरुस्ती करून घेणे शक्य होऊ शकते. तथापि  एजन्सी (साराप्लास्ट) यांनी पुढील ५ वर्षाकरीता सी एस आर पद्धतीने पुन्हा काम करण्यास इच्छुक असून सध्या स्थितीत असलेले ११ ती बसेसची देखभाल व दुरुस्ती करून घेणेबाबत उल्लेख करण्यात आला आहे. सदरच्या “ती” बस मध्ये २ कम्पार्टमेंट असून १ कम्पार्टमेंटमध्ये टॉयलेट व वॉश बेसिन असून दुसऱ्या कम्पार्टमेंटमध्ये चहा , कॉफी व कोल्ड्रिंक्म यासारख्या पदार्थांची विक्री करून तसेच जाहिरात, पे अॅण्ड युज, भाडेतत्वावर या मधून उत्पन्न घेऊन त्याद्वारे देखभाल व दुरुस्ती करणेबाबत प्रस्ताव दिला आहे. सध्यस्थितीत देण्यात आलेल्या प्रस्तावात चहा, कॉफी व कोल्ड्रिंक्स यासारख्या पदार्थांची विक्री करण्याबाबतच्या बाबी नव्याने नमूद करण्यात आल्या असून या बाबी यापूर्वीच्या ११ महिन्याच्या करारनामा यामध्ये नमूद करण्यात आल्या नव्हत्या. तसेच महानगरपालिके कडून ठेकेदाराला (साराप्लास्ट) कोणताही मोबदला देण्यात येणार नाही. असे प्रशासनाच्या प्रस्तावात म्हटलेहोते .

: महिला बाल कल्याण समितीने शुल्क केले होते कमी

महिला बाल कल्याण समिती सदस्यांनी या बस ची पाहणी केली होती. तसेच प्रस्ताव मान्य करताना प्रशासनाचा प्रस्ताव जसाच्या तसा मान्य केला नव्हता. या बस च्या वापरासाठी पैसे न घेता आणि ठेकेदाराला 5 वर्ष ऐवजी 11 महिन्याच्या कराराने देण्यास मान्यता दिली होती. हा प्रस्ताव नंतर स्थायी समितीने मान्य देखील केला. मात्र या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा याला फेरप्रस्ताव देऊन महिला बाल कल्याण समितीचा निर्णय बदलत प्रशासनाचा आहे तसा प्रस्ताव मान्य केला. यामुळे सत्ताधारी भाजपमध्ये समन्वय नसल्याचे समोर आले आहे.

: स्थायी समितीने मान्य केलेला प्रस्ताव असा आहे

१) पुढील ५ वर्षासाठी साराप्लास्ट यांचे मार्फत ११ ती बस टॉयलेटची देखभाल व दुरुस्तीविषयक कामे करणे व किरकोळ दुरुस्ती कामे करणे
२) साराप्लास्ट प्रा ली .यांना जाहिरात ,पे ॲण्ड युज , भाडेतत्वावर आणि पेय जसे चहा, कॉफी कोल्ड्रिंक्स ,मिनरल वॉटर या सारख्या पदार्थांची विक्री करून त्या द्वारे उत्पन्न घेणेबाबत परवानगी देणेस
३) साराप्लास्ट प्रा लि यांना र रु ५ प्रती व्यक्ती याप्रमाणे पे अॅण्ड युज द्वारे उत्पन्न मिळवून प्रोजेक्ट चालविणेस
४) पाणी ,वीज व ड्रेनेज या सुविधांचा खर्च साराप्लास्ट प्रा लि यांचेमार्फत करणेस
५)  साराप्लास्ट प्रा लि यांना योग्य अश्या गरजेच्या ठिकाणी ती बस टॉयलेट लावणेस व तसेच आवश्यकता भासल्यास सदर ती बस टॉयलेट दुसऱ्या योग्य त्या आवश्यक ठिकाणी पुणे महानगरपालिका सोबत समन्वय करून शिफ्ट करणेबाबत परवानगी देणेस
६) वरील बाबींच्या अनुषंगाने त्या करिता मे साराप्लास्ट प्रा लि यांचे सोबत ५ वर्ष पुन्हा नव्याने करारनामा करणेस तसेच दि ६ /९/२०१९ पासूनचा कालावधी समायोजित करणेस मान्यता देण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0