सामान्यांची आरोग्यसेवा स्तुत्य उपक्रम
आमदार सुनील कांबळे यांचे प्रतिपादन
पुणे – सध्या मोठया हॉस्पीटलमध्ये आरोग्याबाबत साधे उपचार करायचे म्हटलं तरी खूप खर्च येतो. आज भाजप महिला आघाडीच्या वतीने सामान्यांसाठी अल्पदरात व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत आमदार सुनील कांबळे यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला आघाडी डॉक्टर सेल व एम्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत व अल्पदरात सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. भवानी पेठेतील सोनावणे रुग्णालय आयोजित या शिबिराला अनेक नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
या शिबिरामध्ये हृदयाच्या तपासण्या प्रोसिजर्स अँजिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी, इतर सर्व शस्त्रक्रिया तसेच जनरल सर्जरी, मेंदूच्या शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, मणक्याचे, ऑर्थोपेडिक, सांधे बदलणे, बॅरिॲट्रिक, नेफरोलॉजी, स्त्रीरोग, सर्व प्रकारच्या लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया,कॅन्सर वरील उपचार केमोथेरपी, अशा अनेक आजाराबाबत उपचार आणि मोफत ऑपरेशन केले जाणार आहेत.
शिबिराचे आयोजन पुणे शहर महिला आघाडी भाजप अध्यक्षा अर्चना पाटील व महिला आघाडी डॉक्टर प्रकोष्ठ अध्यक्ष डॉ. सुप्रिया कुलकर्णी यांनी केले होते. यावेळी माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तुषार पाटील, प्रभाग19 चे अध्यक्ष सनी अडगले, युवा मोर्चा चिटणीस आशिष झांजोट, ओबीसी मोर्चाचे दिनेश रासकर, विश्वास घोलप, एम्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चे डॉ.मलिक, डॉ. दुबे, डॉ. रोकडे मॅडम, नीता गायकवाड, परवीन तांबोळी आणि मोठ्या संख्येने भाजप चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS