महापालिकेच्या प्रांगणात शिवसेनेने भरवली शाळा!
बांधकाम पुर्ण झालेली ई-लर्निंग शाळा सुरु करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन
पुणे – सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक, नऱ्हे, धायरी आदी भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पध्दतीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने गेल्या कित्येक वर्षांपासून वडगाव बुद्रुक येथे पुणे महानगरपालिकेच्या ई-लर्निंग शाळेचे बांधकाम पुर्ण होउन अद्यापदेखील ही शाळा सुरु करण्यासाठी उर्वरित बाबींची पुर्तता पालिकेतील सत्ताधार्यांकडून केली जात नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या परिसरातील मुलांचे उज्ज्वल भविष्य त्यांना मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने महापालिकेच्या प्रांगणातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याखाली शाळा भरवून अनोखे आंदोलन केले गेले.
२०१३ मध्ये सुरु करण्यात आलेल्या या शाळेच्या बांधकासाठीचे बजेट बारा कोटीचे बजेट होते. परंतु बजेट पुरेसे नसल्यामुळे दोन मजले कमी करून तीन मजली इमारत बांधण्यात आली असून काम अंतिम टप्प्यात आले आहे, मात्र पालिकेतील सत्ताधार्यांच्या उदासीनतेमुळे या उर्वरित कामांना निधी मिळेनासा झाला आहे. केवळ देशाचे माजी कृषीमंत्री खा. शरदचंद्रजी पवार यांचे नाव या ई लर्निंग स्कूलला दिल्यामुळेच भाजपची तिरस्काराची भूमिका स्पष्ट होत आहे. या भागातील सत्ताधारी भाजपचे चार नगरसेवक, महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हे जाणून बुजून येथील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप यावेळी शहरप्रमुख संजय मोरे यांनी केला.
शिवसेनेचे खडकवासला क्षेत्र समन्वयक मनिष जगदाळे म्हणाले, ई-लर्निंग शाळा मुद्दाम बंद ठेऊन सत्ताधारी भाजप बहुजन आणि सामान्य स्थानिक विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेत आहे. मात्र सिंहगड रोड परिसरातील विद्यार्थ्यांवर अन्याय करत भाजप कोणता सूड उगावत आहे? असा सवाल जगदाळे यांनी केला आहे.
यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, पुणे मनपा गटनेते पृथ्वीराज सुतार, जिल्हा प्रमुख विजय देशमुख, रमेश कोंडे, शहरसंघटीका संगीताताई ठोसर, सविताताई मते, नगरसेविका प्राचीताई आल्हाट, नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, अशोक हरणावळ, विशाल धनवडे, पल्लवीताई जावळे, श्वेता चव्हाण, युवासेना सहसचिव किरण साळी, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, प्रशांत राणे, आनंद गोयल, बाळासाहेब मालुसरे, मनिष जगदाळे, वैभव हनमघर, अनंत घरत, किशोर रजपूत, नंदू येवले, राजेश चव्हाण, दीपक शेडे, संतोष गोपाळ, राजेंद्र शिंदे, उमेश गालिंदे, संदीप गायकवाड, युवराज पारिख, मुकुंद चव्हाण, कल्पनाताई थोरवे, छाया भोसले, स्वाती कथलकर, रुपेश पवार, संजय वाल्हेकर, प्रथमेश भुकन, संतोष सावंत, राजाभाऊ होले, सुरेश घाडगे, महेश पोकळे, शंकरराव हरपळे, बाळासाहेब गरुड, राजेश वाल्हेकर, राहूल जेटके, सनि गवते, अजय परदेशी, मारुती ननावरे, गणेश कामठे, अक्षय माळकर, चंद्रकांत केगार, संदीप गद्रे, विकी धोत्रे, विनोद सातप, आकाश शिंदे, आशिष शिर्के, विजय पालवे, सुरेश कांबळे, योगेश जैन, राज गडुगुळ, नितिन निगडे, गणेश भापकर, श्रृती नाझरकर, अनिता परदेशी, प्रज्ञा लोणकर, कलावती घाणेकर, शर्मिला येवले, सुनिता खंडाळकर, गायत्री गरुड, भावनाताई थोरात, प्रशांत काकडे उपस्थित होते.
COMMENTS