Amol Balwadkar | बालेवाडी-वाकड जोडरस्ता आणि म्हाळुंगे टी.पी. स्कीमला गती द्या; अमोल बालवडकरांची आयुक्तांकडे मागणी

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन अमोल बालवडकर यांनी रखडलेल्या विकासकामांना गती देण्याची मागणी केली.

HomeBreaking News

Amol Balwadkar | बालेवाडी-वाकड जोडरस्ता आणि म्हाळुंगे टी.पी. स्कीमला गती द्या; अमोल बालवडकरांची आयुक्तांकडे मागणी

Ganesh Kumar Mule Nov 27, 2026 9:26 PM

Amol Balwadkar Foundation | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण अभियानात नावनोंदणी करणाऱ्या महिला भगिनींचा मेळावा | अमोल बालवडकर फाउंडेशनचा उपक्रम 
Amol Balwadkar Foundation | अमोल बालवडकर फाउंडेशनच्या ‘मंगळागौर’ आणि ‘लकी ड्रॉ’ स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद
Pandharpur Wari| अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वारकरी सेवेची २९ वर्षे!

Amol Balwadkar | बालेवाडी-वाकड जोडरस्ता आणि म्हाळुंगे टी.पी. स्कीमला गती द्या; अमोल बालवडकरांची आयुक्तांकडे मागणी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील दीर्घकाळापासून रखडलेल्या विकासकामांना गती मिळावी, यासाठी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन विविध प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. या भेटीत बालेवाडी-वाकड जोडरस्ता आणि म्हाळुंगे टी.पी. स्कीम या महत्त्वाच्या विषयांवर विशेष लक्ष वेधण्यात आले. (Pune Municipal Corporation – PMC)

बालेवाडी-वाकड जोडरस्त्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक असलेली उर्वरित भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी आणि प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी आग्रही मागणी बालवडकर यांनी आयुक्तांकडे केली.

या जोडरस्त्यामुळे बालेवाडी, वाकड आणि परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे रस्त्याच्या कामातील अडथळे दूर करून भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे बालवडकर यांनी सांगितले.

म्हाळुंगे टी.पी. स्कीममधील अडथळे दूर करण्याची मागणी
म्हाळुंगे टी.पी. स्कीमच्या अंमलबजावणीत निर्माण झालेले प्रशासकीय अडथळे दूर करून पुढील आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणीही आयुक्तांकडे करण्यात आली. या योजनेला गती मिळाल्यास परिसरातील नियोजनबद्ध विकासाला चालना मिळू शकते, असे बालवडकर यांनी नमूद केले.

याशिवाय पुणे शहरातील विविध विकासकामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रश्न आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांबाबतही आयुक्तांसोबत चर्चा करण्यात आली.

विकासकामे घोषणांपुरती न राहता प्रत्यक्षात पूर्ण व्हावीत
“पुण्याचा विकास केवळ घोषणांमधून नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून दिसला पाहिजे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित रस्ते, पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध विकासाचे प्रश्न वेळेत मार्गी लागणे आवश्यक आहे,” अशी भूमिका अमोल बालवडकर यांनी मांडली.

प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: