Mohan Joshi Congress | स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला – मोहन जोशी 

स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले मंडई येथील स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास मोहन जोशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला

HomeBreaking News

Mohan Joshi Congress | स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला – मोहन जोशी 

Ganesh Kumar Mule Nov 25, 2026 5:52 PM

Rahul Gandhi Congress | विरोधी पक्षनेते राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्ये करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा | माजी आमदार मोहन जोशी यांची पोलीसांत फिर्याद
Pune Smart City | स्मार्ट सिटीचे ‘गाजर’ दाखवून पुणेकरांची केली फसवणूक | भाजप नेत्यांनी माफी मागावी : माजी आमदार मोहन जोशी
Local Body Elections on Ballot Paper | नादुरुस्त मतदान यंत्रे नकोत | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या

 Mohan Joshi Congress | स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला – मोहन जोशी

 

Pune News – The Karbhari News Service  – स्व.यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण करून महाराष्ट्र घडविला. त्यांच्या विचारांची सद्यस्थितीत गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव मोहन जोशी यांनी आज (बुधवारी) येथे बोलताना केले.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त कसबा ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा फुले मंडई येथील स्मृतीस्थळी अभिवादन कार्यक्रम झाला. मोहन जोशी यांच्या हस्ते स्व. चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी बोलताना मोहन जोशी म्हणाले, “यशवंतराव चव्हाण यांनी दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचा भक्कम पाया रचला. सहकार, कृषी, शिक्षण, उद्योग आणि सामाजिक विकासात त्यांचे कार्य दिशादर्शक ठरले. राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाजाच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम असले पाहिजे, हा त्यांचा विचार आजही महत्त्वाचा आहे. त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”

कार्यक्रमाचे आयोजन कसबा ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी केले होते.

यावेळी पीएमटी माजी चेअरमन बाळासाहेब अमराळे, पुणे शहर इंटक अध्यक्ष चेतन अगरवाल, शहर काँग्रेस उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, माजी ब्लॉक अध्यक्ष प्रविण करपे, भोला वांजळे, युवक काँग्रेस सरचिटणीस सागर धाडवे, अविनाश अडसूळ, धनंजय भिलारे, महेंद्र चव्हाण, उमेश काची, मकरंद माणकिकर, नरेश नलावडे, गोरख पळसकर, गोविंदा वांजळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

——

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: