Pune HCMTR | पुण्याच्या HCMTR प्रकल्पाला धक्का? लोहगावमधील ‘भारत मंडपम’ आरक्षणामुळे मार्ग रद्द; गॅझेटला स्थगिती देण्याची मागणी

तब्बल 39 वर्षांनंतर गती मिळालेल्या पुण्याच्या ड्रीम प्रोजेक्टवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Homeadministrative

Pune HCMTR | पुण्याच्या HCMTR प्रकल्पाला धक्का? लोहगावमधील ‘भारत मंडपम’ आरक्षणामुळे मार्ग रद्द; गॅझेटला स्थगिती देण्याची मागणी

Ganesh Kumar Mule Nov 19, 2026 5:47 PM

Pune BJP New Office |  शहर भाजपचे नवीन कार्यालय सुरू | देवेंद्र फडणवीस यांच्यासहित विविध नेत्यांकडून शुभेच्छा 
BJPs Ghar Ghar Chalo Sampark Abhiyan in pune | भाजपाच्या घर चलो संपर्क अभियानाचा पुण्यात शुभारंभ 
NCP – Sharadchandra Pawar | पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त; गृहमंत्री राजीनामा द्या : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी

Pune HCMTR | पुण्याच्या HCMTR प्रकल्पाला धक्का? लोहगावमधील ‘भारत मंडपम’ आरक्षणामुळे मार्ग रद्द; गॅझेटला स्थगिती देण्याची मागणी

उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

| 30 मीटरचा डीपी रस्ता आणि HCMTR रद्द केल्याचा आरोप

 

Pune News – The Karbhari News Service  – पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी HCMTR (High Capacity Mass Transit Route) प्रकल्पाला लोहगावमधील ‘भारत मंडपम’ प्रकल्पाच्या आरक्षण बदलामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मौजे लोहगाव येथील सर्व्हे क्रमांक 236 आणि 238 मधील आरक्षणे रद्द करताना या जागेवरून जाणारा 30 मीटरचा डीपी रस्ता आणि HCMTR चा मार्गही रद्द करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या निर्णयाला तातडीने स्थगिती देण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात तिन्ही नेत्यांनी 19 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. नगर विकास विभागाने 16 नोव्हेंबर 2026 रोजी MRTP कायद्याच्या कलम 37(2) अन्वये काढलेल्या शासन अधिसूचनेला स्थगिती देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

भारत मंडपमसाठी आरक्षणे रद्द केल्याचा दावा

लोहगाव येथील सर्व्हे क्रमांक 236 आणि 238 या जागेवर भारत मंडपमच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचा प्रस्ताव आहे. या जागेवर यापूर्वी पाणी टाकी, उद्यान, खेळाचे मैदान, भाजी मंडई यांसारख्या सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षणे होती. मात्र, नगर विकास विभागाने 16 नोव्हेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे ही आरक्षणे रद्द केल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, या सर्व्हे क्रमांकांमधून जाणारे दोन महत्त्वाचे रस्तेही रद्द करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये 30 मीटर रुंदीचा विकास आराखड्यातील (डीपी) रस्ता आणि पुणे महापालिकेचा महत्त्वाकांक्षी HCMTR मार्ग यांचा समावेश असल्याचे पत्रात म्हटले आहे.

39 वर्षांनंतर सुरू झालेल्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

HCMTR हा पुणे शहराचा महत्त्वाकांक्षी वाहतूक प्रकल्प असून तब्बल 39 वर्षांनंतर या प्रकल्पाला गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी बैठका घेऊन पाठपुरावा केला. त्यानंतर पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू केले होते, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेत स्थायी समितीने कॉसमॉस बँकेकडून जमीन ताब्यात घेण्यासाठी सुमारे साडेचारशे कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. तसेच सल्लागाराला लेटर ऑफ इंटेंट (Letter of Intent) देण्यात आले होते. संयुक्त मोजणीचे काम सुरू झाले असून महापालिकेकडून HCMTR प्रकल्पाचे सादरीकरणही अंतिम टप्प्यात आले होते.

अशा परिस्थितीत नगर विकास विभागाने लोहगावमधील संबंधित सर्व्हे क्रमांकांवरील आरक्षणांसह HCMTR चा मार्ग रद्द केल्याने प्रकल्पाच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता पत्राद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा

नगर विकास विभागाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करताना केसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांकडे लक्ष वेधले आहे. एखाद्या खात्याने घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करून तो बदलण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. त्यामुळे या अधिकारांचा वापर करून 16 नोव्हेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेला तातडीने स्थगिती द्यावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.

दरम्यान, HCMTR प्रकल्पासाठी जमीन मोजणी आणि भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने यापूर्वी दिले होते. अशा वेळी लोहगावमधील आरक्षण बदलामुळे या प्रकल्पाच्या मार्गावर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: