Ranjit Shirole Joins Congress | मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे काँग्रेसमध्ये; भाजप, आपमधील पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश

मुंबईतील टिळक भवन येथे रणजित शिरोळे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांनी केले स्वागत.

HomeBreaking News

Ranjit Shirole Joins Congress | मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे काँग्रेसमध्ये; भाजप, आपमधील पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश

Ganesh Kumar Mule Nov 04, 2026 7:42 PM

Hinjewadi Shivajinagar Metro | पंतप्रधान मोदींना वेळ मिळेना हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो धावेना | पुणेकरांमध्ये संताप | माजी आमदार मोहन जोशी
Mohan Joshi vs Girish Bapat :मोहन जोशी म्हणतात; मेट्रोचे आंदोलन ही खासदार बापटांची  निव्वळ स्टंटबाजी!
Shivajinagar Hinjewadi Metro | कॉँग्रेस पक्षाच्या दबावामुळे अखेर हिंजवडी मेट्रोला मुहूर्त ! | माजी आमदार मोहन जोशी

Ranjit Shirole Joins Congress | मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे काँग्रेसमध्ये; भाजप, आपमधील पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश

 

Pune News – The Karbhari News Service – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस रणजित श्रीकांत शिरोळे यांनी आज काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे पक्ष प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री अनिस अहमद आदी उपस्थित होते. (Maharashtra Congress)

उरण येथील भाजपाचे पदाधिकारी यशवंत म्हात्रे, आम आदमी पक्षाचे थॉमस मॅथ्यू, सामाजिक कार्यकर्ते जयेश ठाकूर, कृष्णा श्रीवास्तव, सेधुरमण अय्यर यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

देशातील वातावरण बदलले असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर सर्व स्तरातून विश्वास व्यक्त केला जात असून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा ओघही वाढत आहे. दिवाळीची सुरुवात पक्षप्रवेशाचे फटाके फोडून झालेली आहे. आगामी काळात अनेक तरुण व उमदे नेतृत्व काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

शिरोळे कुटुंबाचा काँग्रेस विचारांशी जुना ऋणानुबंध आहे, तोच वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून राहुल गांधी यांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न करू. पक्षाचा एका कार्यकर्ता या नात्याने काँग्रेस विचार घराघरात पोहचवण्याचे काम करू, असे रणजित शिरोळे यावेळी म्हणाले..

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: