PMP Employees Diwali Bonus |  PMPML कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान व बक्षीस द्या; महागाई भत्त्यातही ३ टक्के वाढ लागू करण्याची मागणी

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि वाढीव महागाई भत्ता देण्याची मागणी करणारे युनियनचे निवेदन.

Homeadministrative

PMP Employees Diwali Bonus |  PMPML कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान व बक्षीस द्या; महागाई भत्त्यातही ३ टक्के वाढ लागू करण्याची मागणी

Ganesh Kumar Mule Oct 31, 2026 8:34 AM

Alandi Yatra | आळंदी यात्रेनिमित्त पीएमपीएमएल कडून जादा बसेसचे नियोजन
PMPML | 7th Pay Commission | पीएमपी कर्मचाऱ्यांना जुलै पासून 100% सातवा वेतन आयोग लागू होणार
Bus Day : येत्या सोमवारी PMP च्या ‘एवढ्या’ बसेस रस्त्यावर धावणार!  : सवलतीच्या दरात करता येणार प्रवास : जाणून घ्या सविस्तर 

PMP Employees  Bonus |  PMPML कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान व बक्षीस द्या; महागाई भत्त्यातही ३ टक्के वाढ लागू करण्याची मागणी

| राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे पीएमपीएमएल व्यवस्थापनाला निवेदन

| जुलैपासूनचा महागाई भत्ता फरकही देण्याची मागणी

 

PMPML Diwali Bonus 2026 – The Karbhari News Service – पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपीएमएल) कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वी ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान आणि बक्षिसाची रक्कम अदा करावी, तसेच केंद्र सरकारच्या निर्णयानुसार महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ लागू करून थकबाकीचा फरक द्यावा, अशी मागणी पी.एम.पी.एम.एल. राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात युनियनने महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना दोन स्वतंत्र निवेदने सादर केली आहेत. (Pune PMPML News)

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी युनियनने सानुग्रह अनुदान आणि बक्षिसाचा मुद्दा उपस्थित केला आहे. दरवर्षी प्रथा आणि परंपरेनुसार दिवाळीच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान व बक्षिसाची रक्कम दिली जाते. त्यानुसार सन २०२५-२६ या वर्षाचे ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान आणि बक्षिसाची रक्कम पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांनाही देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ही रक्कम सन २०२६ मधील दिवाळी सणापूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी विनंती युनियनचे पदाधिकारी हरीष ओहळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

| महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ लागू करण्याची मागणी

दुसऱ्या निवेदनातून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. केंद्र शासनाने २९ ऑक्टोबर २०२६ रोजी महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ जाहीर करून तो ६० टक्क्यांवरून ६३ टक्के केल्याचा उल्लेख युनियनने निवेदनात केला आहे.

या निर्णयानुसार पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांनाही ऑक्टोबर महिन्याच्या वेतनात (नोव्हेंबरमध्ये अदा होणाऱ्या वेतनात) वाढीव तीन टक्क्यांसह ६३ टक्के महागाई भत्ता लागू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही वाढ जुलै २०२६ पासून लागू असल्याने जुलै ते सप्टेंबर २०२६ या तीन महिन्यांचा महागाई भत्ता फरकही कर्मचाऱ्यांना अदा करावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

| महामंडळ व्यवस्थापनाच्या निर्णयाकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष

दिवाळी सानुग्रह अनुदान, बक्षीस आणि महागाई भत्त्यातील वाढ या दोन्ही मागण्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हिताशी संबंधित आहेत. त्यामुळे पीएमपीएमएल व्यवस्थापन या मागण्यांबाबत काय निर्णय घेते, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

युनियनच्या वतीने हरीष ओहळ यांनी ही दोन्ही निवेदने सादर केली आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: