PMC Contract Workers | दिवाळीपूर्वी कंत्राटी कामगारांना पगार! | ऑक्टोबरचे वेतन ३० तारखेपर्यंत देण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

PMC Contract Workers | दिवाळीपूर्वी कंत्राटी कामगारांना पगार, ठेकेदारांनी EPF भरणाही वेळेत करण्याचे अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांचे आदेश

Homeadministrative

PMC Contract Workers | दिवाळीपूर्वी कंत्राटी कामगारांना पगार! | ऑक्टोबरचे वेतन ३० तारखेपर्यंत देण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

Ganesh Kumar Mule Oct 21, 2026 6:33 PM

PMC Gunvant Kamgar Purskar | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्कार | अर्ज करण्यासाठी अजून मुदतवाढ
Ganesh Visarjan Holiday | गणेश विसर्जनाच्या सुट्टीबाबत पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश जारी
 Pune Water Supply | पुणे महापालिकेचा विकसकांना दणका! नव्याने समाविष्ट ३२ गावांतील बांधकामांसाठी सुधारित हमीपत्र बंधनकारक; किमान ३ वर्षे पाणीपुरवठ्याची जबाबदारी विकसकांवर

PMC Contract Workers | दिवाळीपूर्वी कंत्राटी कामगारांना पगार! | ऑक्टोबरचे वेतन ३० तारखेपर्यंत देण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

| EPF भरणाही वेळेत करण्याची सक्ती

 

Pune PMC News – The Karbhari News Service –  दिवाळीच्या तोंडावर पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांचे ऑक्टोबर २०२६ चे वेतन सणाआधीच मिळावे, यासाठी प्रशासनाने सर्व विभागांना कडक निर्देश दिले आहेत. ठेकेदारांनी कामगारांना ऑक्टोबरचे वेतन चालू महिन्याच्या ३० तारखेपर्यंत द्यावे आणि त्याच वेळी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा (EPF) भरणाही विहित वेळेत करावा, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) प्रजित नायर यांनी कार्यालयीन परिपत्रकात म्हटले आहे. (Prajit Nair IAS)

 

महापालिकेच्या विविध विभागांमार्फत ठेकेदारांच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांची सेवा घेतली जाते. या कामगारांचे वेतन संबंधित खात्याच्या पर्यवेक्षकीय अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली, त्या खात्यामार्फत नोंदवलेल्या हजेरीनुसार अदा केले जाते. यंदाचा दिवाळी सण पुढील महिन्यात ५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होत असल्याने, कंत्राटी कामगारांना सणाच्या पूर्वी वेतन देणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

चार कलमी निर्देश

१. ३० तारखेपर्यंत वेतन : ज्या विभागांमार्फत कंत्राटी कामगारांची सेवा घेतली जाते, त्यांनी आपल्या अधिनस्त ठेकेदारांना चालू महिन्याच्या ३० तारखेपर्यंत माहे ऑक्टोबर २०२६ चे वेतन आदा करण्यास सांगावे.

२. हजेरीचा आधार : ऑक्टोबर महिन्याची १ ते २० तारखेची प्रत्यक्ष हजेरी विचारात घ्यावी. त्यापुढील २१ ते ३१ तारखेपर्यंत संभाव्य हजेरी गृहीत धरून वेतन द्यावे. म्हणजेच महिना संपण्यापूर्वीच, अंदाजे हजेरीसह पूर्ण महिन्याचे वेतन मिळणार आहे.

३. EPF वेळेत भरणे : संबंधित ठेकेदाराने वेतन देण्यासोबतच कामगारांचा सामाजिक सुरक्षेपोटी भरावयाचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा भरणा विहित वेळेत करावा.

४. खातरजमा व अहवाल : मनुष्यबळाची सेवा घेणाऱ्या विभागांनी ठेकेदारांनी कंत्राटी कामगारांना वेतन दिले आहे का, याची पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांमार्फत खातरजमा करावी. त्याबाबतचा अहवाल त्यांच्याकडून घेऊन त्याची एक प्रत कामगार कल्याण विभागाला पाठवावी.

खातेप्रमुखांवर जबाबदारी

सर्व खातेप्रमुख/विभागप्रमुखांनी या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे आणि आपल्या अधिनस्त जबाबदार पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना याबाबत सूचित करावे, असेही परिपत्रकात म्हटले आहे. परिपत्रकाची प्रत सर्व संबंधित खातेप्रमुख/विभागप्रमुखांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.

EPF चा मुद्दा महत्त्वाचा

यापूर्वी ६ ऑक्टोबर २०२६ च्या परिपत्रकात केंद्राने EPF वेतन मर्यादा १५ हजारांवरून २५ हजार रुपये केल्याने कंत्राटी कामगारांसाठी नवी गणना करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर, वेतनासोबत EPF भरण्याचे निर्देश पुन्हा देण्यात आल्याचे दिसते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: