PMC CCTV Tender | महापालिका शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवणार! २ कोटींचे काम | किती शाळांमध्ये आणि किती कॅमेरे बसवणार, याचा उल्लेख नाही

PMC school CCTV tender

Homeadministrative

PMC CCTV Tender | महापालिका शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवणार! २ कोटींचे काम | किती शाळांमध्ये आणि किती कॅमेरे बसवणार, याचा उल्लेख नाही

Ganesh Kumar Mule Oct 20, 2026 3:27 PM

PMC Encroachment Action | आंबेगाव बु मध्ये सिंहगड कॉलेज जवळील 11 अनधिकृत इमारतीवर महापालिकेकडून कारवाई!
PMC Pedestrian Day | पुणे महापालिकेकडून सलग तिसऱ्या वर्षी पादचारी दिन साजरा
Clean Toilet Challenge | टॉयलेटसेवा अॅप सत्र २ ची सुरुवात उद्यापासून | घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांची माहिती  

PMC CCTV Tender | महापालिका शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवणार! २ कोटींचे काम | किती शाळांमध्ये आणि किती कॅमेरे बसवणार, याचा उल्लेख नाही

| ‘आयसेक्युअर आयटी’ला, ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याची अट; स्थायी समितीसमोर प्रस्ताव

 

Pune PMC News – The Karbhari News Service –  महापालिकेच्या शाळांच्या व्यवस्थापनामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक चांगल्या प्रकारे देखरेख करता यावी, यासाठी शाळा इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. या कामासाठी मे. आयसेक्युअर आयटी प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या ठेकेदार कंपनीची सर्वात कमी दराची (०.२२ टक्के कमी) निविदा पात्र ठरली असून, जीएसटीसह १ कोटी ९९ लाख ५५ हजार ६३७ रुपये ५४ पैशांच्या कामाला मान्यता देण्याची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान  किती शाळांमध्ये आणि किती कॅमेरे बसवणार, याचा उल्लेख मात्र विषयपत्रात दिसून येत नाही. (PMC Standing Committee)

 

महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा पुरवणे, बसवणे आणि सुरू करणे, हे या कामाचे स्वरूप आहे. विद्युत विभागाने तयार केलेल्या पूर्वगणनपत्रकानुसार या कामात पुढील साहित्य व कामांचा समावेश आहे :

पीव्हीसी वायरिंग, २ कोअर १.५ sq. mm कॉपर वायर
HDMI केबल, कॅट ६ केबल
८ पोर्ट स्विच, नेटवर्किंग साहित्य, 6U रॅक
ऑनलाईन यूपीएस
LED टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरा, डिस्प्ले
नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डर आणि तदनुषंगिक विद्युत विषयक कामे

 

या कामाचे पूर्वगणनपत्रक १,९९,९९,६३७/- रुपये (१८ टक्के जीएसटीसह) इतके तयार करण्यात आले आहे. सन २०२६-२७ च्या बजेटमध्ये “प्राथमिक शिक्षण… मनपा शाळा इमारतीमध्ये CCTV कॅमेरा” या अर्थशीर्षकावर (RE12A113G) २ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध आहे. या तरतुदीस ४ मे २०२६ रोजी झालेल्या वित्तीय समितीच्या बैठकीत वित्तीय मान्यता मिळाली आहे. तांत्रिक छाननी समितीने ठराव क्र. ५२ (दि. १८/०६/२०२६) अन्वये पूर्वगणनपत्रकाला मान्यता दिली आहे.

तीन पात्र ठेकेदार आणि त्यांचे दर

ठेकेदार दर निविदा रक्कम (जीएसटीसह)
आयसेक्युअर आयटी प्रा. लि. ०.२२% कमी १,९९,५५,६३७.५४
जे.डी. एंटरप्रायझेस ०.००% (जाहिरात रकमेइतकेच) १,९९,९९,६३७.००
निखिल नेटवर्क्स ०.००% (जाहिरात रकमेइतकेच) १,९९,९९,६३७.००

जाहिरात केलेली निविदा रक्कम रु. १,६९,४८,८४५/- (अधिक १८% जीएसटी रु. ३०,५०,७९२/-) अशी होती. आयसेक्युअर आयटीने ०.२२ टक्के कमी दर भरल्याने त्यांची निविदा रक्कम रु. १,६९,११,५५७.५४ अधिक जीएसटी रु. ३०,४४,०८०/-, म्हणजेच एकूण रु. १,९९,५५,६३७.५४ इतकी येत आहे. जाहिरात रकमेच्या तुलनेत ही बचत सुमारे ४४ हजार रुपयांची आहे.

दर बाजारभावाशी सुसंगत, ठेकेदाराकडून परफॉर्मन्स सिक्युरिटी जमा

प्रशासनाने दर बाजारभावाशी योग्य व सुसंगत असल्याचे नमूद केले आहे. ठेकेदाराने परफॉर्मन्स सिक्युरिटी म्हणून आवश्यक रकमेचा डी.डी. पुणे मनपाकडे जमा केला असून, मान्य स्पेसिफिकेशननुसार काम करून देण्याबाबतचे हमीपत्रही दिले आहे. टेंडर स्पेसिफिकेशननुसार काम करून घेण्याची दक्षता विभागामार्फत घेतली जाईल. त्यानुसार आयसेक्युअर आयटीच्या निविदेची शिफारस करण्यात आली आहे.

४ महिन्यांत काम पूर्ण करण्याची अट

काम पूर्ण करण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. आयसेक्युअर आयटीला वर्क ऑर्डरपासून काम सुरू करण्याचे आणि त्यांच्याशी करारनामा करण्याचे प्रस्तावित आहे. या कामामुळे शाळांच्या व्यवस्थापनामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगली देखरेख करणे शक्य होईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: