PMC Contract Employees | पुणे महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस द्या! | स्थायी समितीसमोर प्रस्ताव

पुणे महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी सानुग्रह अनुदान व बोनस देण्याची मागणी.

HomeBreaking News

PMC Contract Employees | पुणे महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस द्या! | स्थायी समितीसमोर प्रस्ताव

Ganesh Kumar Mule Oct 14, 2026 7:19 PM

PMC Employees Diwali Bonus | पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदाना बाबतचे परिपत्रक जारी | 8.33% + 21000 सानुग्रह अनुदान
PMC Contract Labour Bonus Circular | कंत्राटी कामगारांचे बोनस बाबतचे धोरण जाहीर | २३१० ते ३७७५ रु इतकी होणार वेतनात वाढ!  | दिवाळीला १० हजारांची उचल देखील दिली  जाणार!
PMC Employees Diwali Bonus | पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | सानुग्रह अनुदान अर्थात बोनस बाबतचे परिपत्रक जारी |  ८.३३% + २३,००० रु. सानुग्रह अनुदान

PMC Contract Employees | पुणे महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस द्या! | स्थायी समितीसमोर प्रस्ताव

| कायम कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सानुग्रह अनुदान आणि बक्षिसी देण्याची मागणी; सुनील यादव शिंदे यांचा प्रस्ताव

 

Pune PMC News – The Karbhari News Service – पुणे महानगरपालिकेच्या कायम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान आणि बक्षिसी अर्थात बोनस दिला जातो. त्याच धर्तीवर महापालिकेच्या विविध विभागांत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस देण्यात यावा, अशी मागणी करणारा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या सेवेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही दिवाळीच्या काळात आर्थिक दिलासा मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. (Sunil Shinde Congress)

पुणे महानगरपालिकेच्या अनेक विभागांमधील विविध कामे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केली जातात. महापालिकेच्या कामकाजात या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असते. मात्र, कायम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान व बक्षिसी दिली जात असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही त्याच धर्तीवर लाभ मिळावा, अशी भूमिका या प्रस्तावातून मांडण्यात आली आहे.

कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ देण्याची मागणी

महापालिकेच्या कायम कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान आणि बक्षिसी दिली जाते. त्याच पद्धतीने कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह अनुदान व बक्षिसीची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे.

कंत्राटी कर्मचारीही महापालिकेच्या विविध कामांमध्ये योगदान देत असल्याने त्यांनाही दिवाळीच्या सणानिमित्त आर्थिक लाभ मिळावा, हा या प्रस्तावामागील प्रमुख मुद्दा आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या मागणीचा विचार झाल्यास कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळू शकतो.

सुनील शिंदे यांचा प्रस्ताव

या प्रस्तावाचे सूचक सुनील यादव शिंदे असून, रामचंद्र ऊर्फ चंदू शेठ कदम हे अनुमोदक आहेत. आता या प्रस्तावावर स्थायी समितीमध्ये काय भूमिका घेतली जाते आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याबाबत पुढील निर्णय काय होतो, याकडे महापालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष राहणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: