Otur News | वाघिरे महाविद्यालयात “ओझरच्या विघ्नेश्वरा” गीताच्या अल्बमचे दिमाखात प्रमोशन

HomePune

Otur News | वाघिरे महाविद्यालयात “ओझरच्या विघ्नेश्वरा” गीताच्या अल्बमचे दिमाखात प्रमोशन

Ganesh Kumar Mule Sep 17, 2026 8:38 PM

Marathi Bhasha Gaurav Din | युवा पिढीने मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर पोहोचवावे | प्रा डॉ. वसंत गावडे
Annasaheb Waghire College | अभिजात मराठी भाषेला गौरवशाली परंपरा: प्रा. डॉ. वसंत गावडे
Pune News | ओतूरमध्ये चौथा राज्यस्तरीय श्रावणधारा काव्यमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न | ८३ कवींनी सादर केल्या रचना

Otur News | वाघिरे महाविद्यालयात “ओझरच्या विघ्नेश्वरा” गीताच्या अल्बमचे दिमाखात प्रमोशन

| माजी-विद्यमान विद्यार्थ्यांनी जपली संस्कृतीची नाळ

 

Waghire College Otur -(The Karbhari News Service) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथे महाविद्यालयाच्या माजी आणि विद्यमान विद्यार्थ्यांच्या सहकार्याने साकारलेल्या *‘ओझरच्या विघ्नेश्वरा’* या भक्तीगीताचा भव्य प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. (Ozarchya Vighneshwara)

“आपली संस्कृती, आपली ओळख!” या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून या गीताची निर्मिती करण्यात आली असून, मराठी मातीची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, मातीतले संस्कार आणि महाविद्यालयाशी जोडलेले भावनिक नाते याचा सुंदर आविष्कार या गीतातून साधण्यात आला आहे.

हे गीत इंद्रजीत आणि वृंदा आदित्य कामठे यांना समर्पित करण्यात आले आहे. *नाद मराठी एंटरटेनमेंट व शिवराय फिल्म्स प्रस्तुत* या गीताच्या निर्मितीमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे योगदान विशेष लक्षणीय ठरले आहे.

*गीत निर्मिती टीम:*

या गीताचे निर्माते *आदित्य कामठे व चैतन्य मनोज चौधरी* असून सहनिर्माते राजेंद्रकुमार देसाई आहेत. कार्यकारी निर्माते सुशील पिंगळे असून कथा-पटकथा व दिग्दर्शन *ओंकार शिवाजी भालेराव* यांनी केले आहे. कलाकार म्हणून चैतन्य चौधरी, वल्लरी शिंदे, संचिता खंडागळे यांनी भूमिका साकारल्या आहेत.

गीतकार व संगीतकार *योगीराज पालवे*, गायक *पार्थ गरुड, दिशा वाव्हळ*, सहगायिका संस्कृती क्षीरसागर, संगीत संयोजक श्रेयस मिसाळ, छायाचित्रण आफाण मोमीन, सहदिग्दर्शक मानसी जाधव, सहाय्यक दिग्दर्शक श्रद्धा अहिनवे आणि संकलन श्रीनिवास गज्जलवार यांनी आपले बहुमूल्य योगदान दिले आहे.

या निर्मितीसाठी *श्री. विघ्नेश्वर देवस्थान ट्रस्ट, ओझरचे अध्यक्ष मा. बाळकृष्ण कवडे आणि सर्व विश्वस्त मंडळ* यांनी विशेष सहकार्य केले असून त्यांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.

*महाविद्यालयाची ओळख अधोरेखित:*

या गीताच्या माध्यमातून अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाची शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख तसेच अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझरच्या विघ्नेश्वराशी असलेले नाते अधिक दृढ करण्यात आले आहे.

*प्रकाशन सोहळा उत्साहात:*

कार्यक्रमाचे प्रास्ताविक *डॉ. वसंत गावडे* यांनी केले. त्यांनी गीत निर्मितीमागील संकल्पना आणि माजी-विद्यमान विद्यार्थ्यांच्या भावनिक नाळेविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य *डॉ. रमेश शिरसाठ* होते. अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले, “माजी आणि विद्यमान विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महाविद्यालयाची ओळख आणि मराठी संस्कृतीचे प्रतिबिंब गीताच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले आहे. अशा उपक्रमांमुळे महाविद्यालयाशी विद्यार्थ्यांचे नाते अधिक दृढ होते आणि गौरवशाली परंपरेला नवी दिशा मिळते.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *डॉ. राहुल पाटील* यांनी केले तर आभार *अर्णव बेनके* याने मानले.

यावेळी डॉ. सुधीर बोराटे, प्रा. जगताप, डॉ. नंदकिशोर उगले, डॉ. राजेश रसाळ, डॉ. राजेंद्र आंबवणे, डॉ. किशोर काळदंते, प्रा. सुवर्णा डुंबरे, प्रा. विद्या कोठावळे, श्री. राजेंद्रकुमार शेळके, श्री. उत्तम कारभळ, श्री. कन्हैया अभंग, श्री. सतिश दांगट, निखिल काकडे, श्री. सुरेश थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. गीताच्या निर्मितीशी संबंधित आजी-माजी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: