Pune PMC News |  वारजेतील DP रस्ता आणि मुठा नदी सुधार प्रकल्पाचा घोळ | प्रशासनाचा मोठा खुलासा

Homeadministrative

Pune PMC News |  वारजेतील DP रस्ता आणि मुठा नदी सुधार प्रकल्पाचा घोळ | प्रशासनाचा मोठा खुलासा

Ganesh Kumar Mule Sep 08, 2026 11:14 AM

Mahalunge | Heavy Rain | मुसळधार पावसाने म्हाळुंगे गावातील घरे पाण्याखाली  | औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून केली गेली मदत 
Ajit Pawar | शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
PMC Fireman Bharti | फायरमन पदाच्या लेखी परीक्षेची उत्तरपत्रिका व विवरणी मनपा वेबसाईट वर प्रसिद्ध

Pune PMC News |  वारजेतील DP रस्ता आणि मुठा नदी सुधार प्रकल्पाचा घोळ | प्रशासनाचा मोठा खुलासा

 

Warje DP Road – (The Karbhari News Service) – वारजे परिसरातील मुठा नदी पात्रातून जाणारा २४ मीटरचा डीपी रस्ता आणि पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हे दोन प्रकल्प एकाच Alignment वर येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे दुहेरी काम आणि कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जाण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक स्वप्नील  दुधाने यांनी शहर सुधारणा समितीकडे प्रस्ताव दिला होता. (Pune Municipal Corporation – PMC)

नगरसेवक दुधाने यांनी रोजी दिलेल्या पत्रानुसार शहर सुधारणा समितीने महापालिका आयुक्तांकडे अभिप्राय मागवला होता. त्यावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी  सविस्तर अभिप्राय सादर केला आहे.

प्रशासनाच्या अभिप्रायात नेमके काय म्हटले आहे?

१. पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत मुळा, मुठा आणि मुळा-मुठा नदीच्या ४४.४० किमी लांबीचे काम ११ टप्प्यांमध्ये करण्यात येत आहे.
२. यातील *स्ट्रेच – ६ म्हणजे राजाराम पूल ते वडगाव (वारजे) बायपास* हा टप्पा सुमारे ४.१० किमीचा आहे. दोन्ही काठ धरून त्याची लांबी ८.२ किमी इतकी होते.
३. या कामासाठी सुमारे *३६६.५७ कोटी + GST व रॉयल्टी टेस्टिंग चार्जेससह ४४९.९१ कोटी* रुपयांच्या पूर्वगणन पत्रकास तांत्रिक छाननी समितीने दि. ०८/०९/२०२५ रोजी मान्यता दिली आहे.
४. वारजे हद्दीमध्ये नदीपात्रात डीपी प्लॅनमध्ये २४ मीटरचा रस्ता दाखवण्यात आला असून प्रत्यक्ष जागेवर हा रस्ता नदीपात्रातच येत आहे. त्यामुळे नदीकाठ सुधार प्रकल्प आणि हा डीपी रस्ता हे दोन्ही *Overlap (परस्पर व्यत्यय)* होत आहेत.

*४ ठिकाणी थेट अतिक्रमण, प्रशासनाने मान्य केले*

प्रशासनाने पथ विभाग, मंजूर प्रकल्प आराखडे, Project Boundary, Design Drawings, River Cross Sections यांची पडताळणी केली असता ८.३५ किमी पैकी ४ ठिकाणी डीपी रस्ता हा नदी प्रकल्पाच्या हद्दीत येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

*१) वारजे पुलाजवळ (RMC Plant परिसर) -* सुमारे ०.४० किमी लांबीमध्ये डीपी रस्ता थेट नदी प्रकल्पाच्या Project Boundary मध्ये येतो. तिथे River Edge Development प्रस्तावित आहे.
*२) वारजे एस.टी.पी. परिसर -* सुमारे ०.२० किमी लांबीमध्ये रस्ता आणि नदी प्रकल्पाच्या संरचनेत हस्तक्षेप होत आहे.
*३) दुधाने लॉन्स परिसर -* सुमारे ०.४० किमी लांबीमध्ये हा रस्ता नदी सुधार प्रकल्पाच्या विकास क्षेत्रात येतो. तिथे नदीकाठ संरक्षण, हरित पट्टा व सार्वजनिक सुविधा नियोजित आहेत.
*४) विठ्ठल मंदिर, विठ्ठलवाडी परिसर -* सुमारे ०.४० किमी लांबीमध्ये दोन्ही प्रकल्पांची अंमलबजावणी एकाच जागेवर प्रस्तावित आहे.

 “सदर बाबींचा विचार करता, वरील चार ठिकाणी प्रस्तावित डी.पी. रस्त्याची विद्यमान संरेखन (Alignment) कायम ठेवून स्वतंत्रपणे विकास केल्यास नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी मंजूर आराखड्यामध्ये मूलभूत बदल करावे लागू शकतात,” असा स्पष्ट इशारा आयुक्त कार्यालयाने दिला आहे.

प्रशासनाची भूमिका – रस्ता नदी प्रकल्पासोबतच करावा

नगरसेवक दुधाने यांनी वारजे हद्दीमधील सदर २४ मीटरचा रस्ता हा नदी काठ सुधार प्रकल्पासोबतच करणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला प्रशासनाच्या अभिप्रायाने दुजोरा दिला आहे.

सल्लागार संस्था मे. एच.सी.पी. डिझाईन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रा. लि., अहमदाबाद यांनी दिलेल्या तांत्रिक अभिप्रायानुसार संबंधित भागातील डी.पी. रस्त्याचे संरेखन नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या अंतिम आराखड्याची तपासणी करून आवश्यक ते बदल करण्यात येतील.

तसेच, पुढील कार्यवाही करताना पथ विभागासोबत समन्वय साधून मंजूर आराखडे, Project Boundary, पर्यावरणीय मंजुरीतील अटी, Hydrology, Hydraulic Safety, River Cross Sections या सर्व तांत्रिक बाबींचा संयुक्तपणे विचार करून निर्णय घेण्यात येईल, असे महापालिका आयुक्तांनी शहर सुधारणा समितीस कळवले आहे.

थोडक्यात, वारजेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा डीपी रस्ता स्वतंत्रपणे न करता नदी सुधार प्रकल्पासोबतच एकत्रितपणे केल्यास नदीच्या संरचनात्मक, पर्यावरणीय आणि जलवैज्ञानिक (Hydrological) कामावर प्रतिकूल परिणाम टळणार असून महापालिकेचा दुहेरी खर्चही वाचणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: