PMC Employees | PMC मधील रिक्त पदांचा डोंगर उघड – १२ वर्षांपासून सरळसेवेची भरतीच नाही! – PMC एम्प्लॉईज युनियन
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठी वानवा निर्माण झाली आहे. २०१४ चा आकृतीबंध मंजूर झाल्यापासून गेली *१२ वर्षे सरळसेवेची भरतीच झाली नसल्याने* प्रशासनाचा कारभार मंदावला असून, विद्यमान कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. (PMC Employees Union)
धक्कादायक आकडेवारी:
– *उप अधीक्षक – ८७ पदे रिक्त (४०%):* सरळसेवेची ५४ पैकी ५४ पदे रिक्त, पदोन्नतीची ३३ पदे रिक्त.
– *प्रशासन अधिकारी – ३२ पदे रिक्त:* सरळसेवेची १५ आणि पदोन्नतीची १७ पदे रिक्त.
– *महापालिका सहायक आयुक्त – ११ पदे रिक्त:* २५% सरळसेवेची ६ पैकी ६ पदे रिक्त.
– *अधीक्षक – ९ पदे रिक्त.*
PMC एम्प्लॉईज युनियनची मागणी:
कामाचा बोजा कमी करण्यासाठी आणि नागरिकांची कामे रखडू नयेत म्हणून, रिक्त पदांवर सध्याच्या अनुभवी सेवकांमधून ‘तदर्थ पदोन्नती’ (Ad-hoc Promotion) देऊन पदे तातडीने भरण्याची जोरदार मागणी युनियनने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
आता आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
—
संघटना म्हणून प्रशासनाला विनंती आहे की आकृतीबंधमध्ये दुरुस्ती करून सर्व प्रमोशनच्या जागा या 100% पदोन्नतीने भरण्यात याव्यात तसेच तीन वर्षाची अनुभवाची अट शिथिल करण्यात यावी जेणेकरून पात्र सेवकांना त्या पदावर काम करण्याची संधी मिळेल.
– बजरंग पोखरकर, अध्यक्ष, पीएमसी एम्प्लॉईज युनियन पुणे महानगरपालिका
—

COMMENTS