PMC Ideal Teacher Award | पुणे महापालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार | आता 30 शिक्षकांना मिळणार | निवड समितीत पदाधिकाऱ्यांचा समावेश

Homeadministrative

PMC Ideal Teacher Award | पुणे महापालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार | आता 30 शिक्षकांना मिळणार | निवड समितीत पदाधिकाऱ्यांचा समावेश

Ganesh Kumar Mule Aug 18, 2026 8:43 AM

Pune Ring Road | पुणे चक्राकार महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती
MP Supriya sule | नगर मध्ये बारा तास अडकलेली निजामुद्दीन एक्स्प्रेस खा. सुळेंच्या प्रयत्नामुळे सकाळी पुण्यात| प्रवाशांनी मानले सुप्रियाताईंचे आभार
Pune Rain | 39 वॉटर लॉगिंग स्पॉटसाठी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करा – स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

PMC Ideal Teacher Award | पुणे महापालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार | आता 30 शिक्षकांना मिळणार | निवड समितीत पदाधिकाऱ्यांचा समावेश

शिक्षण समितीत प्रस्ताव मंजूर

PMC Education Committee – (The Karbhari News Service)  – पुणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराची संख्या वाढवण्यात आली आहे. शिक्षण समितीच्या बैठकीत प्रशासनाच्या मूळ प्रस्तावात उपसूचना देऊन सुधारणा करत यंदा 25 ऐवजी एकूण 30 शिक्षकांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात ५ खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा समावेश आहे. (PMC Education Department – Primary)

याचबरोबर पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करणाऱ्या समितीत आता केवळ प्रशासकीय अधिकारी नसून महापालिकेचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांनाही समाविष्ट करण्यात आले आहे.

प्रशासनाने शिक्षण समितीसमोर सादर केलेल्या मूळ प्रस्तावात शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आदर्श शिक्षक पुरस्कार 25 शिक्षकांना देण्याची तरतूद होती. तसेच पुरस्कारासाठी निवड समितीमध्ये फक्त प्रशासकीय अधिकारी होते.

शिक्षण समितीने काय बदल केले?

शिक्षण समितीने या प्रस्तावावर चर्चा करत दोन महत्त्वाचे बदल केले.

पहिला बदल निवड समितीच्या रचनेत करण्यात आला. आता या समितीमध्ये महापौर, उप महापौर, सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष, शिक्षण समिती अध्यक्ष, शिक्षण समिती उपाध्यक्ष, शिक्षण समिती सदस्य, उप आयुक्त शिक्षण विभाग, प्रशासनाधिकारी शिक्षण विभाग, सहायक प्रशासनाधिकारी शिक्षण विभाग, राज्य पुरस्कार किंवा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक यांचा समावेश असेल. अध्यक्षपद महापौर भूषवणार आहेत. ही उपसूचना सदस्य अतुल तरवडे आणि कोमल नवले यांनी दिली.

दुसरा बदल पुरस्कारांच्या संख्येत करण्यात आला. मूळ 25 च्या संख्येत 5 ची भर घालून आता एकूण 30 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाणार आहे. ही उपसूचना सदस्य अरविंद शिंदे आणि ऐश्वर्या पाटील यांनी दिली.

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे. निवड प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि लोकप्रतिनिधींनाही सहभाग मिळावा यासाठी समितीत पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

शिक्षण समितीच्या या निर्णयामुळे अधिक शिक्षकांना प्रोत्साहन मिळणार असून महापालिका शाळांमधील शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: