PMC Education Committee | पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षक बदली धोरणात बदल!

Homeadministrative

PMC Education Committee | पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षक बदली धोरणात बदल!

Ganesh Kumar Mule Aug 18, 2026 8:25 AM

PMC Primary Education Department | पुणे मनपा शिक्षक बदल्यांचे धोरण जिल्हा परिषद शिक्षकांच्या धर्तीवर!
PMC Standing Committee | स्थायी समिती सह सर्व विषय समित्या आज अस्तित्वात येणार | आजच्या विशेष सभेत निवडले जाणार सदस्य
PMC School Attendence | पुणे महापालिकेच्या  शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांच्या हजेरीसाठी आता ऑनलाईन प्रणाली!

PMC Education Committee | पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षक बदली धोरणात बदल

शिक्षण समितीने उपसूचना देऊन प्रस्ताव मंजूर केला

प्रशासकीय बदलीसाठी 10 वरून 5 वर्षे तर विनंती बदलीसाठी 5 वरून 3 वर्षे अट

 

PMC Primary Teacher – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग प्राथमिकमधील शिक्षकांच्या बदली धोरणात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. प्रशासनाने सादर केलेल्या मूळ प्रस्तावात उपसूचना देऊन सुधारणा करत शिक्षण समितीने  हा प्रस्ताव मंजूर केला. (PMC Primary School Teachers Transfer)

प्रशासनाचा मूळ प्रस्ताव काय होता?
महापालिकेच्या अखत्यारीत एकूण 320 शाळा असून त्यामध्ये 15 क्षेत्रीय विभागांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या विनंती आणि प्रशासकीय बदल्या शासन निर्णयानुसार केल्या जातात. शासनाने नवीन बदलीचे धोरण निश्चित करण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रशासनाने खालीलप्रमाणे प्रस्ताव सादर केला होता.

1. प्रशासकीय बदली: एकाच शालेय प्रांगणात असलेल्या इमारतीमध्ये मिळून सलग 10 वर्षे सेवा पूर्ण केलेला शिक्षक प्रशासकीय बदलीसाठी पात्र असेल.
2. विनंती बदली: एकाच शाळेत सलग 5 वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर विनंती बदलीची मागणी करता येईल.
3. बदलीचे वर्ष 31 मार्च या तारखेनुसार निश्चित करण्यात येईल.

शिक्षण समितीने काय उपसूचना दिली?
समितीने प्रस्तावावर चर्चा करून शिक्षकांना दिलासा देणाऱ्या तीन महत्त्वाच्या उपसूचना मंजूर केल्या.

1. प्रशासकीय बदलीसाठीची अट 10 वर्षांवरून 5 वर्षे केली. त्यामुळे एकाच शालेय प्रांगणातील इमारतीमध्ये सलग 5 वर्षे सेवा पूर्ण केलेला शिक्षक प्रशासकीय बदलीसाठी पात्र ठरेल. तसेच दरवर्षी कार्यरत शिक्षकांच्या 20 टक्के मर्यादेत प्रशासकीय बदल्या करण्यात येतील.

2. विनंती बदलीसाठीची अट 5 वर्षांवरून 3 वर्षे केली. त्यानुसार एकाच शाळेत 3 वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर शिक्षक विनंती बदलीची मागणी करू शकतील.

3. शासनाच्या प्राधान्य क्रम 1 ते 20 मधील बाबींनुसार विनंती बदलीसाठी 1 वर्षापेक्षा कमी सेवा कालावधी असतानाही अपवादात्मक परिस्थितीत महापालिका आयुक्त निर्णय घेऊ शकतील.

सध्या अनेक शिक्षक एकाच ठिकाणी दीर्घकाळ कार्यरत असल्याने बदलीची मागणी करत होते. अटी शिथिल झाल्याने शिक्षकांना वेळेवर बदलीची संधी मिळणार आहे. तसेच प्रशासकीय बदल्यांमध्ये 20 टक्के मर्यादा घातल्याने समतोल राखला जाणार आहे.

शिक्षण समितीच्या या निर्णयामुळे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून बदली प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: