Independence Day | पुणे महानगरपालिकेत उत्साहात साजरा झाला भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन

Homeadministrative

Independence Day | पुणे महानगरपालिकेत उत्साहात साजरा झाला भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन

Ganesh Kumar Mule Aug 15, 2026 3:26 PM

PMC Employees DA Hike | केंद्राच्या धर्तीवर महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित महागाई भत्ता लागू करा | मार्च पेड इन एप्रिल च्या वेतनात अदा करण्याची मागणी 
PMC Standing committee approval to increase fine from Rs 180 to Rs 500
PMC Deputy Municipal Secretary Promotion | उपनगरसचिव पदाच्या बढती प्रक्रिये बाबत उचित कार्यवाही करण्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे आदेश

Independence Day | पुणे महानगरपालिकेत उत्साहात साजरा झाला भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण, सायकल रॅलीला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन पुणे महानगरपालिकेत उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवार  15 ऑगस्ट  रोजी महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. (Pune Municipal Corporation – PMC)

महापालिका प्रांगणात सकाळी आयोजित या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर, अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख, उपायुक्त, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्यास पुष्प अर्पण करून केली. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर प्रथम राष्ट्रीय गीत वंदे मातरम गायन झाले. त्यानंतर महापौर यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत सादर करण्यात आले.

ध्वजवंदनानंतर क्रीडा विभागाच्या वतीने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्या सहकार्याने घेण्यात आली. सायकल रॅलीला महापौर मंजुषा नागपुरे आणि आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.

पुणे मनपा भवन येथून सुरू झालेली ही रॅली मॉडर्न कॅफे, जंगली महाराज रस्ता, खंडोजी बाबा चौक, अलका टॉकीज चौक, टिळक रोड, पुराम चौक, बाजीराव रस्ता, शनिवार वाडा मार्गे पुन्हा पुणे मनपा भवन येथे येऊन संपन्न झाली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सायकलस्वार सहभागी झाले होते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त महापालिका प्रांगणात देशभक्तीचे वातावरण होते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रतिसाद दिला.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: