Sharad Pawar News | शरद पवार यांना सल्ला देण्याऐवजी स्वतःच्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करा – श्रीकांत पाटील

HomeBreaking News

Sharad Pawar News | शरद पवार यांना सल्ला देण्याऐवजी स्वतःच्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करा – श्रीकांत पाटील

Ganesh Kumar Mule Aug 05, 2026 9:37 PM

Holiday for all schools in Pune | पुण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी | शिक्षक व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावे लागणार 
Pune Water Supply | पावसामुळे पाण्यात गढूळपणा वाढला |  पिण्यापूर्वी पाणी स्थिर ठेवून तुर्टीने गाळून उकळून प्या
Ganesh Visarjan | गणेश विसर्जनानंतर मुर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास मनाई – पुणे शहर पोलीस उपआयुक्तांचा आदेश

Sharad Pawar News | शरद पवार यांना सल्ला देण्याऐवजी स्वतःच्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करा – श्रीकांत पाटील

 

Shrikant Patil NCP SCP – (The Karbhari News Service) – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर राज्याच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका माजी खासदारांनी शरद पवार यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (NCP SCP Pune)

शरद पवार हे देशाच्या राजकारणातील अत्यंत अनुभवी आणि सर्वमान्य नेतृत्व आहे. सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्षातील नेते, अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय विषयांवर त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेतले जाते. अशा नेत्याला सल्ला देण्यापेक्षा स्वतःच्या राजकीय भूमिकेचा आणि निर्णयांचा आत्मपरीक्षण करणे अधिक उचित ठरेल, असे पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले, काही महिन्यांपूर्वी तुम्ही कोणाच्या सल्ल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश केला, हे जनते विसरलेले नाही. त्यामुळे इतरांना राजकीय सल्ले देण्यापूर्वी स्वतःच्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करावे. यापुढे सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये.

राजकारणात उंची पदामुळे मिळत नाही तर ती कर्तृत्व, सातत्य आणि जनमानसाच्या विश्वासाने मिळते. ज्यांची राजकीय उंची अजूनही टेकू शोधत आहे, त्यांनी आकाशाला उंचीचे धडे देऊ नयेत. पात्रता नसताना असे वक्तव्य करणे म्हणजे इतरांपेक्षा स्वतःचेच हसू करून घेणे आहे, अशी टीका श्रीकांत पाटील यांनी केली.

सुनेत्रा पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. अशा प्रकारच्या खालच्या पातळीवरील राजकारणाने लोकशाहीला बाधा पोहोचते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: