PMC Employees | हायकोर्टाच्या आदेशानंतर पुणे पालिकेतील 60 कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती!

Homeadministrative

PMC Employees | हायकोर्टाच्या आदेशानंतर पुणे पालिकेतील 60 कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती!

Ganesh Kumar Mule Aug 04, 2026 7:23 PM

Shivajinagar Hinjewadi Metro : उदघाटनासाठी कोणा नेत्याची वाट बघू नका | शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो सेवा त्वरीत सुरु करा | माजी आमदार मोहन जोशी
Safai Mitra | PMC Pune | सफाई मित्र यांना सुरक्षा साधने व आयुष्यमान कार्डचे वितरण | पुणे महानगरपालिका प्रशासनाचा उपक्रम 
sound limit | Ganeshotsav | गणेशोत्सवात रात्री १० पर्यंतच्या ध्वनीमर्यादेला आता पाच दिवसांची सवलत गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे

PMC Employees | हायकोर्टाच्या आदेशानंतर पुणे पालिकेतील 60 कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती!

पीएमसी एम्प्लॉईज युनियनकडून आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह अधिकाऱ्यांचा सत्कार

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाची गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली पदोन्नती प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाने 60 कर्मचाऱ्यांना कनिष्ठ अभियंता पदावर पदोन्नती दिली आहे. याशिवाय आरोग्य निरीक्षक पदावर 6 कर्मचाऱ्यांनाही पदोन्नती देण्यात आली आहे. (PMC Employees Union)

पदोन्नतीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. पुणे महापालिकेने 29 जानेवारी 2021 च्या परिपत्रकानुसार सेवांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी 25 टक्के पदोन्नतीचा कोटा निश्चित केला होता. मात्र 11 जून 2025 रोजी प्रशासनाने ही प्रक्रिया रद्द करण्याचा आदेश काढला होता. याविरोधात कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.


या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने 30 जून 2026 रोजी महापालिकेचा रद्दचा आदेश रद्दबातल ठरवला. तसेच पीएमसी सेवा नियम 2014 नुसार 3 डिसेंबर 2021 आणि 31 मे 2023 च्या ज्येष्ठता यादीच्या आधारे 25 टक्के पदोन्नती प्रक्रिया तीन आठवड्यांच्या आत पूर्ण करून नियुक्ती पत्रे देण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला दिले होते.

हायकोर्टाच्या निर्देशानंतर महापालिका प्रशासनाने तात्काळ पावले उचलली. त्यानुसार 60 कर्मचाऱ्यांना कनिष्ठ अभियंता सिव्हिल पदावर आणि 6 कर्मचाऱ्यांना आरोग्य निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. यामुळे अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


पदोन्नतीचा प्रश्न सुटल्याबद्दल आणि न्यायालयाच्या आदेशाची जलद अंमलबजावणी केल्याबद्दल पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर, उपायुक्त किशोरी शिंदे आणि विधी अधिकारी निशा चव्हाण यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी युनियनचे अध्यक्ष बजरंग पोखरकर म्हणाले, आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी कायमच सेवक हिताला प्राधान्य दिले आहे. पदोन्नतीसह कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे आणि सकारात्मक निर्णय त्यांनी घेतले आहेत. संघटनेला कायमच त्यांचे सहकार्य मिळत आहे.

या सत्कार प्रसंगी युनियनचे पदाधिकारी विशाल ठोंबरे, पूजा देशमुख, छाया सूर्यवंशी, अजित गारळे, दिपक भिसे, गिरीश बहिरट यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: