Pune Grand Tour | पुणे ग्रँड टूरच्या कामात दर्जा ठेवा | निकृष्ट ठेकेदारांवर कारवाई करा | माजी विरोधी पक्षनेत्यांची महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे मागणी

Homeadministrative

Pune Grand Tour | पुणे ग्रँड टूरच्या कामात दर्जा ठेवा | निकृष्ट ठेकेदारांवर कारवाई करा | माजी विरोधी पक्षनेत्यांची महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे मागणी

Ganesh Kumar Mule Aug 04, 2026 6:20 PM

PMC Road Department | सायकल स्पर्धेत जसे रस्ते तयार केले, त्याच दर्जाचे रस्ते पुढील काळात करावेत | अतिरिक्त आयुक्तांचे पथ विभागाला आदेश  | शहर परिवर्तन समिती स्थापन करण्यात येणार 
PMC Pune News | अनावश्यक खोदाई केल्यास कारवाई | अतिरिक्त महापालिका आयुक्तांचा इशारा
Pune Grand Cycle Tour | एका रस्त्याच्या सौन्दर्यीकरणासाठी १.८९ कोटी रुपये! | पुणेकरांचा कररुपी पैशाची काळजी घ्या | माजी नगरसेवकांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Pune Grand Tour | पुणे ग्रँड टूरच्या कामात दर्जा ठेवा | निकृष्ट ठेकेदारांवर कारवाई करा | माजी विरोधी पक्षनेत्यांची महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे मागणी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे ग्रँड टूर 2027 सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामात दर्जा सुनिश्चित करण्यासाठी आणि निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन दिले आहे. (Pune Breking News)

या पत्रात त्यांनी मागील वर्षी सायकल स्पर्धेच्या मार्गावर झालेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप केला आहे. पावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्याचा थरच निघाला आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चेंबर समपातळीसाठी नवीन एसओपी अंतर्गत मोठा खर्च करण्यात आला असला तरी बहुतांश ठिकाणी चेंबरच्या बाजूचे काँक्रीट निघून गेले आहे आणि मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. ही परिस्थिती सायकलपटू आणि वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.

पत्रातील प्रमुख मागण्या

निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना यंदाच्या निविदा प्रक्रियेतून अपात्र ठरवावे किंवा त्यांना काळ्या यादीत टाकावे.
मोठ्या निविदांमधील कामे उपठेकेदारांकडे जाऊ नयेत यासाठी निविदांमध्ये संयुक्त उपक्रम म्हणजेच जॉइंट व्हेंचरची अट टाकावी. यामुळे कामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण राहील आणि जबाबदारी निश्चित होईल.
सायकल स्पर्धेच्या मार्गावरील सर्व रस्त्यांची कामे Engineers India Limited म्हणजेच ईआयएल संस्थेच्या देखरेखीखाली आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेअंतर्गत करावीत. मागील स्पर्धेच्या वेळीही ही मागणी करण्यात आली होती, मात्र त्याचा विचार झाला नव्हता, असे पत्रात म्हटले आहे.

या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून संबंधित विभागाला सूचना देऊन दर्जेदार कामे करून घ्यावीत आणि दोषींवर कारवाई करावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.

या निवेदनाची प्रत महापौर मंजुषा नागपुरे यांनाही पाठवण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: