Pune Breaking News | मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख शहरी वाहतूक प्रकल्पांबाबत उच्चस्तरीय समितीची  बैठक 

Homeadministrative

Pune Breaking News | मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख शहरी वाहतूक प्रकल्पांबाबत उच्चस्तरीय समितीची  बैठक 

Ganesh Kumar Mule Jul 27, 2026 10:16 PM

Again four member wards | पुन्हा चार सदस्यीय प्रभाग | 2017 नुसार वाॅर्ड संख्या
Maratha Community : Yuvraj Sambhajiraje Chhatrpati : मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय : खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण मागे
Agricultural awards : कृषी पुरस्कारांच्या रकमेत पाचपटीने वाढ!

Pune Breaking News | मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख शहरी वाहतूक प्रकल्पांबाबत उच्चस्तरीय समितीची  बैठक

 

Pune Traffic – (The Karbhari News Service) – पुणे शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत वाहतूक विकासाच्या दृष्टीने आज मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख शहरी वाहतूक प्रकल्पांच्या नियोजन, वित्तीय व्यवस्थापन, अंमलबजावणी व देखरेखीसाठी गठित उच्चस्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

या बैठकीस मा.उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  सुनेत्रा अजित पवार, मा.राज्यमंत्री मा. माधुरी मिसाळ तसेच राज्य शासन, पुणे महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (Maha Metro) आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये पुणे महानगरपालिकेचे मा. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रस्तावित High Capacity Mass Transit Route (HCMTR) प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण केले. या सादरीकरणामध्ये प्रकल्पाची संकल्पना, उद्दिष्टे, प्रस्तावित मार्ग, वाहतूक व्यवस्थेवरील परिणाम, शहराच्या भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी करण्यात येणारे उपाय, आर्थिक नियोजन, जमीन संपादन, विविध विभागांमधील समन्वय तसेच प्रकल्पाच्या टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीचा आराखडा याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाचा सखोल आढावा घेत विविध बाबींवर मार्गदर्शन केले. HCMTR प्रकल्पामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ, वेगवान, सुरक्षित आणि भविष्याभिमुख होणार असून मेट्रो, रिंग रोड, बस सेवा तसेच इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी प्रभावी समन्वय साधला जाणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

तसेच प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेले राज्य शासनाचे प्रशासकीय, वित्तीय व तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. विविध विभागांमध्ये समन्वय राखून प्रकल्पाला गती देण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाही बाबतही निर्देश देण्यात आले.

पुणे शहराच्या दीर्घकालीन वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने HCMTR हा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि परिवर्तनशील प्रकल्प असून, त्याच्या प्रभावी नियोजन व जलद अंमलबजावणीसाठी आजची उच्चस्तरीय बैठक अत्यंत फलदायी व उपयुक्त ठरली. राज्य शासन आणि पुणे महानगरपालिका यांच्या समन्वयातून हा प्रकल्प निश्चितच पुणे शहराच्या आधुनिक, सक्षम आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेच्या उभारणीत महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: