Palakhi Sohala 2026 | ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखींचे पुण्यात स्वागत

Homeadministrative

Palakhi Sohala 2026 | ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखींचे पुण्यात स्वागत

Ganesh Kumar Mule Jul 09, 2026 8:13 PM

PMC CHS | सैनिक प्रवर्गातून नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांना CHS योजनेचे सभासद करता येणार नाही | महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 
PMC Pune Property tax | 184 crore rupees deposited in the coffers of Pune Municipal Corporation from property tax
PMC Schools | महापालिका शाळेतील प्रत्येक विद्यार्थी संगणकीय कौशल्यानी विकसित व्हावा | आयुक्त विक्रम कुमार 

Palakhi Sohala 2026 | ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखींचे पुण्यात स्वागत

महापौर मंजुषा नागपुरे यांनी कळस आणि बोपोडी येथे दोन्ही पालख्यांचे केले औक्षण

वारकऱ्यांसमवेत फुगडीचा आनंद; ‘पुणे प्रथम-सेवावारी २०२६’ अंतर्गत सेवाभावाचा अनोखा संगम

 

Pune Palakhi Sohala – (The Karbhari News Service) – आषाढातील रिमझिम सरी, टाळ-मृदुंगाचा अखंड निनाद, भगव्या पताकांनी दुमदुमलेले रस्ते आणि लाखो कंठातून घुमणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ चा जयघोष… अशा भक्तिमय वातावरणात पुणे शहराने आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे उत्स्फूर्त, भव्य आणि भावपूर्ण स्वागत केले. अवघे पुणे शहर विठ्ठलमय झाले असताना वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता आणि सेवाभावाच्या परंपरेचे पुणेकरांनी जल्लोषात स्वागत केले.
महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘पुणे प्रथम-सेवावारी २०२६’ उपक्रमांतर्गत दोन्ही पालखी सोहळ्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले. (Pune PMC News)

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे महापौर मंजुषा नागपुरे यांनी भक्तिभावाने औक्षण करत स्वागत करत पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी वारकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या अखंड जयघोषात वारकरी महिला भगिनींसमवेत फुगडी खेळत त्यांनी वारीतील आनंद, उत्साह, समता आणि सेवाभावाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून अनुभवला.

यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, राष्ट्रवादी गटनेते सोपान सोपान चव्हाण, पक्षनेते नितीन गावडे, आयुक्त नवलकिशोर राम यांच्यासह स्थानिक नगरसेवक, पुणे महानगरपालिका अधिकारी तसेच स्थानिक नागरिक व वारकरी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘पुणे प्रथम-सेवावारी २०२६’ या उपक्रमांतर्गत वारकरी भाविकांसाठी पालखी मार्ग आणि मुक्कामस्थळांवर स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तात्पुरती स्वच्छतागृहे, वैद्यकीय सेवा, प्रकाश व्यवस्था, अग्निसुरक्षा, आपत्कालीन प्रतिसाद पथके, नियंत्रण कक्ष आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेचे सर्व विभाग वारकरी भाविकांच्या सेवेसाठी समन्वयाने कार्यरत आहेत.

संतांनी दिलेला समता, बंधुता, सेवा आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारा हा उपक्रम पारंपरिक श्रद्धेला आधुनिक व्यवस्थापनाची प्रभावी जोड देत आहे. दोन्ही पालखी सोहळ्यांच्या स्वागतातून पुणे शहराने वारकरी संप्रदायाप्रती असलेली आपली श्रद्धा, आपुलकी आणि सेवाभाव पुन्हा एकदा अधोरेखित केला.
——–

१० जुलै रोजी सामूहिक ऑनलाईन पसायदान पठण

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदान या विश्वप्रार्थनेचा संदेश जगभरातील भाविकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून १० जुलै रोजी रात्री ९ वाजता सामूहिक ऑनलाईन पसायदान पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वबंधुत्व, मानवता आणि विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात देश-विदेशातील भाविक डिजिटल माध्यमातून सहभागी होऊ शकणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण www.punepratham.org या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे.
——–

 

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन हा प्रत्येक पुणेकरासाठी अभिमानाचा आणि भाग्याचा क्षण आहे. दोन्ही पालख्यांचे औक्षण करून स्वागत करताना आणि वारकरी भगिनींसमवेत फुगडी खेळताना वारीतील समता, भक्ती आणि आनंदाचा विलक्षण अनुभव घेता आला. वारकरी बांधवांची सेवा हीच संतसेवा मानून महानगरपालिकेचे सर्व विभाग ‘पुणे प्रथम-सेवावारी २०२६’ अंतर्गत अहोरात्र कार्यरत आहेत. स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, सुरक्षा यांसह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, संतांनी दिलेला समता-बंधुतेचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

मंजुषा नागपुरे, महापौर, पुणे 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: