Khadakwasla Dam Chain | खडकवासला धरण साखळीच्या पाणीसाठ्यात वाढ २४ तासांत १.८४ टीएमसीने वाढ 

Homeadministrative

Khadakwasla Dam Chain | खडकवासला धरण साखळीच्या पाणीसाठ्यात वाढ २४ तासांत १.८४ टीएमसीने वाढ 

Ganesh Kumar Mule Jul 06, 2026 8:13 AM

 Khadakwasla Dam | खडकवासला धरणसाखळीतील  पाणीसाठा वाढला | खडकवासला धरणातून ८७३४ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग!
Pune Water Cut Update | पावसाच्या ओढीने पुणे शहरात लवकरच एक दिवसाआड पाणी!
Khadakwasla Dam | Pune Rain Update | खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता | नदी काठच्या लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Khadakwasla Dam Chain | खडकवासला धरण साखळीच्या पाणीसाठ्यात वाढ २४ तासांत १.८४ टीएमसीने वाढ

| चारही धरणे २३.७८% भरली

 

Pune Rain – (The Karbhari News Service) –पुणे शहर आणि जिल्ह्याला  पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात गेल्या २४ तासांत चांगली वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे चारही धरणांतील एकूण पाणीसाठा ६.९३ टीएमसी इतका झाला आहे. २४ तासांपूर्वी हा साठा ५.०९ टीएमसी होता. (Pune Rain News)

आज सकाळी ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, चारही धरणांमध्ये एकूण १८७१ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक* झाली आहे.

धरणनिहाय पाणीसाठा आणि आवक

*1) खडकवासला धरण*
– *२४ तासातील पाऊस*: ४१ मिमी
– *एकूण पाऊस*: २०४ मिमी
– *पाणीसाठा*: ०.४० टीएमसी – *२०.३०%*
– *आवक*: +१३७ क्यूसेक
– *पाणीपातळी*: ५७८.६० मीटर
– *विसर्ग*: सांडव्यातून ० टीएमसी विसर्ग
– *पाणीपुरवठा*: PMC ला ३७८ क्यूसेक

*2) पानशेत धरण*
– *२४ तासातील पाऊस*: १५ मिमी
– *एकूण पाऊस*: ४९३ मिमी
– *पाणीसाठा*: ३.०३ टीएमसी – *२८.५१%*
– *आवक*: +५८८ क्यूसेक
– *पाणीपातळी*: ६१७.३७ मीटर
– *विसर्ग*: वीज निर्मिती, कालवा, नदीत ०

*3) वरसगाव धरण*
– *२४ तासातील पाऊस*: १२ मिमी
– *एकूण पाऊस*: ४७१ मिमी
– *पाणीसाठा*: ३.१९ टीएमसी – *२४.८७%*
– *आवक*: +९२४ क्यूसेक
– *पाणीपातळी*: ६१९.१० मीटर
– *विसर्ग*: वीज निर्मिती, कालवा ००

*4) टेमघर धरण*
– *२४ तासातील पाऊस*: २१५ मिमी
– *एकूण पाऊस*: ६३५ मिमी
– *पाणीसाठा*: ०.३१ टीएमसी – *८.३०%*
– *आवक*: +२ क्यूसेक
– *पाणीपातळी*: ६७१.९० मीटर
– *विसर्ग*: सर्व विसर्ग ००

गेल्या वर्षीच्या तुलनेत साठा कमी

आज चारही धरणांमध्ये एकूण *६.९३ टीएमसी म्हणजे २३.७८%* पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा *१८.३५ टीएमसी म्हणजे ६२.९५%* इतका होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साठा अजूनही लक्षणीयरीत्या कमी आहे.

*प्रशासनाची स्थितीवर नजर*

धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. सध्या कोणत्याही धरणातून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाही. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काळात विसर्गाबत निर्णय घ्यावा लागू शकतो, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या या चारही धरणांवर प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: