Pune PMC News | अत्यावश्यक सेवांसाठी PMRDA कडून  अमेनिटी  स्पेसमधील मोजक्या जागा तात्काळ ताब्यात घेण्याचा निर्णय

Homeadministrative

Pune PMC News | अत्यावश्यक सेवांसाठी PMRDA कडून  अमेनिटी  स्पेसमधील मोजक्या जागा तात्काळ ताब्यात घेण्याचा निर्णय

Ganesh Kumar Mule Jul 04, 2026 9:06 AM

PMC Employees Promotion | महापालिकेच्या तीन कार्यकारी अभियंत्यांना अधिक्षक अभियंता पदावर पदोन्नती! | शहर सुधारणा समितीची मान्यता
PMC CIC | नदीपात्र स्वच्छतेसाठी ‘जाळी आणि निर्माल्य कलश’ प्रस्तावाला उपसूचनेसह मंजुरी
Merged 23 Villages DP | शहराच्या नियोजनाला गती देणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रस्तावास शहर सुधारणा समितीची मान्यता

Pune PMC News | अत्यावश्यक सेवांसाठी PMRDA कडून  अमेनिटी  स्पेसमधील मोजक्या जागा तात्काळ ताब्यात घेण्याचा निर्णय

| अत्यावश्यक सेवांसाठी शहर सुधारणा समितीची उपसूचनेसह मंजुरी

PMC CIC – (The Karbhari News Service) – नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा तातडीने सुरू करण्यासाठी PMRDA कडून अमेनिटी स्पेसमधील मोजक्या जागा तात्काळ ताब्यात घेऊन कार्यवाही करावी, असा महत्त्वाचा निर्णय पुणे महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समितीने घेतला आहे. यासह प्रभाग क्र. १५ मधील विरंगुळा केंद्र व नाना-नानी पार्क उभारण्याचा प्रस्तावही मान्य करण्यात आला.   (PMC City Improvement Committee)

नगरसेवक डॉ. दादा कोद्रे यांनी मांडलेल्या प्रस्तावात केशवनगर, मांजरी बु, साडेतरा नळी, शेवाळवाडी या भागात जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व नाना-नानी पार्कची मागणी केली होती. जागेसाठी मनपाच्या अमेनिटी स्पेसचा वापर करावा, अशी मूळ मागणी होती.

या प्रस्तावावर चर्चा करताना समिती सदस्य श्रीकांत जगताप यांनी उपसूचना मांडली. अजित घुले यांनी त्याला अनुमोदन दिले.

उपसूचनेत स्पष्टपणे म्हटले आहे:  “PMRDA कडून जागा ताब्यात घेण्यासाठी शासकीय प्रक्रियेत कधी कधी जास्त वेळावधी लागू शकतो. ही बाब लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवांसाठी मोजक्या जागा ताब्यात घेऊन तात्काळ कार्यवाही सुरू करावी.”

म्हणजेच संपूर्ण जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट न पाहता,  नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या विरंगुळा केंद्र व नाना-नानी पार्कसारख्या अत्यावश्यक सेवांसाठी PMRDA च्या ताब्यातील मोजक्या जागा प्राधान्याने ताब्यात घेऊन काम सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

केशवनगर, मांजरी बु, साडेतरा नळी, शेवाळवाडी भागातील मोठ्या संख्येने असलेल्या जेष्ठ नागरिकांना व्यायाम, योगा, वाचन आणि सामाजिक संवादासाठी लवकरच हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: