PMC SDD Schemes | पुणे मनपाच्या समाज विकास विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू | ६ जुलै ते ३१ डिसेंबरपर्यंत अर्जाची मुदत
| महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सायकल ते परदेशी शिक्षणापर्यंत अर्थसहाय्य
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे सन २०२६-२०२७ या वर्षासाठी विविध कल्याणकारी योजनांची जाहीर प्रकल्प प्रसिद्ध करण्यात आली आहे. महिला व बाल कल्याण, मागासवर्गीय कल्याण आणि युवक कल्याण या तीन घटकांअंतर्गत एकूण १३ हून अधिक योजनांसाठी पात्र विद्यार्थी, महिला आणि युवकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. (PMC Social Devlopment Department)
अर्ज प्रक्रिया दि. ६ जुलै २०२६ ते दि. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरून करता येणार आहे.
महत्त्वाच्या योजना कोणत्या?
मागासवर्गीय कल्याणकारी योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सायकल सुविधा : १०वी, १२वी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या मागासप्रवर्गीय विद्यार्थ्यांना, ज्यांना दहावी/बारावीत ६०% गुण आहेत आणि घरापासून महाविद्यालय २ किमी पेक्षा जास्त अंतरावर आहे, त्यांना सायकल खरेदीसाठी अर्थसहाय्य.
घाणभत्ता मिळणाऱ्या मागासवर्गीय सेवकांच्या मुलांसाठी अर्थसहाय्य : ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य.
कचरा वेचक कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य अर्थसहाय्य : पुणे मनपातील कचरा वेचक व बायोमेडिकल कचऱ्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ८ वी ते १२ वी च्या मुलांसाठी.
महिला व बाल कल्याण + मागासवर्गीय कल्याणकारी योजना
कमवा व शिका : १०वी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना दरसाल शैक्षणिक अर्थसहाय्य. किमान ५०% गुण आवश्यक.
१०वी नंतर विद्यार्थ्यांसाठी खाजगी वसतीगृहासाठी अर्थसहाय्य : ६०% पेक्षा अधिक गुण मिळवून १०वी नंतर प्रवेश घेतलेल्या मुली व ५५% पेक्षा अधिक गुण मिळवून प्रवेश घेतलेल्या मुलांसाठी.
महिला, मागासवर्गीय व युवक कल्याणकारी योजना १२वी नंतर खाजगी वसतीगृहासाठी अर्थसहाय्य : ६०% पेक्षा अधिक गुण मिळवून १२वी नंतर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी. फक्त कॉमर्स व सायन्स शाखेसाठी लागू.
CET परीक्षेच्या वर्गांसाठी अर्थसहाय्य : १२वी नंतर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सीईटी, मेडिकल, इंजिनिअरिंगच्या प्रवेशपूर्व कोचिंगसाठी. १२वी मध्ये ६०% पेक्षा अधिक गुण आवश्यक.
उच्च व्यावसायिक तांत्रिक शिक्षणासाठी अर्थसहाय्य : मेडिकल, इंजिनिअरिंग, व्यवस्थापन, संगणक इ. शाखांसाठी शासकीय संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना. प्रवेश वर्षी ६०% गुण आवश्यक.
स्वरोजगारासाठी अनुदान : १८ ते ४५ वयोगटातील पुरुष/महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एकरकमी अनुदान.
इतर विशेष योजना
परदेशात उच्च शिक्षणासाठी अनुदान : पुणे मनपा हद्दीतील पहिल्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय, प्रथम येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी. शैक्षणिक फंड व घरगुती उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक.
असलेल्या व्यवसायासाठी एकरकमी अर्थसहाय्य : व्यवसाय सुरू असलेल्या महिला, विशेषतः मागासवर्गीय महिलांसाठी.
अर्ज कसा करायचा?
सर्व योजनांसाठी अर्ज फक्त ऑनलाईन स्वीकारले जातील. वेबसाईट : http://dbt.pmc.gov.in अर्जाची अंतिम तारीख : ३१ डिसेंबर २०२६
योजनांचे सविस्तर नियम, अटी व पात्रता याच संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी नागरिकांनी ९०१०२०२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उप आयुक्त, समाज विकास विभाग, आशा राऊत यांनी केले आहे.

COMMENTS