Nyati Group | न्याती ग्रुपची ‘३० वर्षे, ३० वृक्ष’ पर्यावरण मोहीम | डॉ. नितीन न्याती यांच्या वाढदिवसानिमित्त येरवड्यात वृक्षारोपण

HomeBreaking News

Nyati Group | न्याती ग्रुपची ‘३० वर्षे, ३० वृक्ष’ पर्यावरण मोहीम | डॉ. नितीन न्याती यांच्या वाढदिवसानिमित्त येरवड्यात वृक्षारोपण

Ganesh Kumar Mule Jul 03, 2026 7:46 PM

PMC Kamgar Union | कामगार युनियन कडून चतुर्थ श्रेणी कामगारांना दाखवण्यात आला मराठी चित्रपट
Departmental Examination | PMC Pune | विभागीय परीक्षेसाठी पात्र कर्मचाऱ्यांची यादी जाहीर!   | तिन्ही पेपर  लेखी घेण्याबाबत आग्रह 
PMC Commissioner Vikram Kumar | उत्पन्न वाढीसाठी नियोजन करा  | महापालिका आयुक्तांच्या टॅक्स विभागाला सूचना 

Nyati Group | न्याती ग्रुपची ‘३० वर्षे, ३० वृक्ष’ पर्यावरण मोहीम | डॉ. नितीन न्याती यांच्या वाढदिवसानिमित्त येरवड्यात वृक्षारोपण

 डीसीपी वाहतूक कार्यालयासमोर ३० देशी वृक्षांचे रोपण; ‘हरित उद्यासाठी’ नागरिकांना सहभागाचे आवाहन

 

Dr Nitin Nyati – (The Karbhari News Service) – बांधकाम क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘न्याती ग्रुप’ने आपल्या व्यावसायिक उत्कृष्टतेच्या यशस्वी ३० व्या वर्षात पदार्पण केले आहे. या सुवर्णमयी मैलाच्या दगडाचे औचित्य साधून आणि समूहाचे दूरदर्शी नेते, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. नितीन न्याती यांच्या वाढदिवसानिमित्त आज,  ३ जुलै रोजी एका विशेष वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले.  (Pune News)

३० वर्षे – ३० वृक्ष’ ही संकल्पना

निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि भावी पिढ्यांसाठी समृद्ध हरित वारसा मागे ठेवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. “३० वर्षे – ३० वृक्ष” या संकल्पनेअंतर्गत या मोहिमेत ३० स्थानिक देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. वड, पिंपळ, कडुलिंब, आंबा, जांभूळ यांसारख्या पर्यावरणपूरक आणि दीर्घायुषी वृक्षांची निवड करण्यात आली आहे.

ही वृक्षारोपण मोहीम डीसीपी वाहतूक कार्यालय, गोल्फ कोर्स समोर, येरवडा, पुणे येथे संपन्न झाली. न्याती ग्रुपचे अधिकारी, कर्मचारी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

एकत्र मिळून हरित उद्या घडवूया’

न्याती ग्रुपने या पर्यावरणपूरक उपक्रमात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ‘चला, एकत्र मिळून एक हरित उद्या घडवूया!’ असा संदेश देत कंपनीने पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारीही न्याती ग्रुपने घेतली आहे.

गेल्या ३० वर्षांत पुण्याच्या स्कायलाईनमध्ये दर्जेदार प्रकल्प उभे करताना पर्यावरणाचा समतोल राखण्यावर न्याती ग्रुपने नेहमीच भर दिला आहे. व्यावसायिक यशाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत डॉ. नितीन न्याती यांच्या नेतृत्वाखाली समूहाने शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले आहेत. ‘३० वर्षे, ३० वृक्ष’ ही मोहीम त्याच वाटचालीचा एक भाग आहे, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: