Pune PMC News | महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष व चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त पुणे महापालिकेत वर्षभर विविध कार्यक्रम |  पक्षनेते सभेची मान्यता

Homeadministrative

Pune PMC News | महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष व चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त पुणे महापालिकेत वर्षभर विविध कार्यक्रम |  पक्षनेते सभेची मान्यता

Ganesh Kumar Mule Jun 29, 2026 7:49 PM

Dr Babasaheb Ambedkar | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून संयुक्त अभिवादन
Ajit Pawar |  जाती-धर्माचे राजकारण आणू नका | अजित पवार
Ring Road Pune | रिंगरोड साठी 47 हेक्टर वनजमीनीची आवश्यकता | ऑनलाईन प्रस्ताव वन विभागाकडे सादर

Pune PMC News | महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष व चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त पुणे महापालिकेत वर्षभर विविध कार्यक्रम |  पक्षनेते सभेची मान्यता

 

 

PMC All Party Leader Meeting – (The Karbhari News Service) –  महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त तसेच चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्याच्या प्रस्तावाला आज झालेल्या पक्षनेते सभेत मान्यता देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)

उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी  पुणे महानगरपालिकेत या ऐतिहासिक वर्षानिमित्त भव्य आणि नियोजनबद्ध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. या मागणीस आज पक्षनेते सभेने मंजुरी दिली.

यावर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांचे द्विशताब्दी वर्ष देशभर आणि राज्यभर मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. तसेच पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांच्या कार्याला १५० वर्षे पूर्ण होत असून, सामाजिक समतेच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण चवदार तळे सत्याग्रहालाही १०० वर्षे पूर्ण होत आहेत. महात्मा फुले यांची कर्मभूमी असलेल्या पुण्यात या ऐतिहासिक घटनांचे स्मरण भव्य स्वरूपात व्हावे, या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने या उपक्रमासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली होती. तसेच एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या मुख्यसभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याची आग्रही मागणी केली होती. त्यावेळी सभापती म्हणून मा. उपमहापौर यांनी प्रशासनाला यासाठी समिती स्थापन करून नियोजन करण्याचे निर्देश दिले होते.

मान्य झालेल्या प्रस्तावानुसार पुणे महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, गटनेते आणि सभासद(नगरसेवक) सदस्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती संपूर्ण वर्षभराच्या कार्यक्रमांचे नियोजन, समन्वय आणि प्रभावी अंमलबजावणी करेल. समितीवरील दोन सदस्यांची नियुक्ती पक्षनेते सभेमार्फत करण्यात येणार असून, वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या नियोजन व अंमलबजावणीचे अधिकार  महापौर यांना प्रदान करण्यात आले आहेत.

या उपक्रमांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शाळा-महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व, निबंध, चित्रकला व इतर स्पर्धा, विचारप्रबोधनपर व्याख्याने, मिरवणुका, प्रदर्शन, सामाजिक जनजागृती अभियान तसेच महात्मा फुले यांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा व्यापक प्रसार करणारे विविध उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहेत.
या निर्णयामुळे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रभावी प्रचार-प्रसार होऊन नव्या पिढीपर्यंत त्यांचा सामाजिक परिवर्तनाचा वारसा अधिक व्यापकपणे पोहोचेल, असा विश्वास मा. उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0