PMC Standing Committee | जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयात अधिकारी नियुक्त करणार | श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Homeadministrative

PMC Standing Committee | जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयात अधिकारी नियुक्त करणार | श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Ganesh Kumar Mule Jun 25, 2026 7:45 PM

PMPML Employees Diwali Bonus | पीएमपी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा प्रस्ताव पुणे महापालिका आयुक्तांच्या टेबलवर पडून!
Akhil Bharatiya Sahitya Sammelan | अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ‘सरकार्यवाह’पदी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
By-election | Chinchwad | चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

PMC Standing Committee | जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयात अधिकारी नियुक्त करणार | श्रीनाथ भिमाले यांची माहिती

 

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील जन्म व मृत्यू दाखल्यांमधील दुरुस्तीची कामे गेल्या महिनाभरापासून ठप्प असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत स्थायी समितीच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असून सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हे अधिकारी नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांना आवश्यक मार्गदर्शन करतील, तसेच आवश्यकतेनुसार सॉफ्टवेअर मध्ये तातडीने दुरुस्ती करण्यात येईल अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (PMC Health Department)

भिमाले म्हणाले, “जन्म-मृत्यू दाखल्यांमधील नाव, जन्मतारीख, पालकांचे नाव, लिंग, स्पेलिंग आदी दुरुस्त्यांचे अधिकार महानगरपालिकेला देण्यासंदर्भात राज्य शासनाशी आयुक्त स्तरावर प्रशासन संपर्क साधणार आहे. त्याचबरोबर सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणींमुळे हजारो अर्ज प्रलंबित राहिले असून नागरिकांची शाळा-महाविद्यालय प्रवेश, पासपोर्ट, आधार, मतदान ओळखपत्र, वारसा, बँक आणि इतर शासकीय कामे खोळंबली आहेत. त्यासाठी आज बैठकीत निर्णय घेण्यात आले.”

या पार्श्वभूमीवर प्रशासनाला प्रलंबित अर्जांचा तपशील, सॉफ्टवेअरमधील त्रुटी, २०१९ पूर्वीच्या सुमारे २४ लाख नोंदींच्या डिजिटायझेशनची सद्यस्थिती, शासनाशी झालेला पत्रव्यवहार तसेच प्रश्न सोडविण्याची निश्चित कालमर्यादा याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे भिमाले यांनी सांगितले.

नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात स्वतंत्र मार्गदर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार असून, नियुक्त अधिकारी दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करतील. त्यामुळे नागरिकांच्या वारंवार होणाऱ्या फेऱ्या कमी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: