Pune Breaking News | नाला सफाई, राडारोडा आणि पूर प्रतिबंधक उपाययोजनांना गती देण्याचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश | कचरा आणि स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर

Homeadministrative

 Pune Breaking News | नाला सफाई, राडारोडा आणि पूर प्रतिबंधक उपाययोजनांना गती देण्याचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश | कचरा आणि स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर

Ganesh Kumar Mule Jun 18, 2026 7:55 AM

PMRDA News | स्ट्रक्चरल प्लॅनच्या कामाला गती द्या |  नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या पीएमआरडीएला सूचना
Minister Madhuri Misal | नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार सुविधा निर्माण कराव्यात | वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ
Minister Madhuri Misal | सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी  ‘बार्टी’ ला केल्या या सूचना! 

 Pune Breaking News | नाला सफाई, राडारोडा आणि पूर प्रतिबंधक उपाययोजनांना गती देण्याचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश | कचरा आणि स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर

 

Pune News – (The Karbhari News Service) – पावसाळ्याच्या तोंडावर पुणे शहरात संभाव्य पूरस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन किती सज्ज आहे, याचा सखोल आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नाला सफाई, राडारोडा व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. (Pune PMC News)

बैठकीला विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, हडपसरचे आमदार चेतन तुपे, कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने आणि खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव तापकीर उपस्थित होते. महापालिकेकडून महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, प्रजीत नायर, ओमप्रकाश दिवटे हे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पावसाळ्यापूर्वी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रतिबंधात्मक उपाययोजना पूर्ण कराव्यात, असे स्पष्ट निर्देश दिले.

नाला सफाई: शहरातील नाला सफाईची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कामाचा दर्जा आणि गतीवर विशेष लक्ष देण्यास सांगितले.राडारोडा व्यवस्थापन: रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी साचणारा राडारोडा उचलण्याची यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

पूर प्रतिबंधक उपाय: नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश देण्यात आले.

कचरा आणि स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर बैठकीत घनकचरा व्यवस्थापनावर सविस्तर चर्चा झाली. कचरा डेपो परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा आमदारांनी उपस्थित केला. शहरातील कचरा संकलन क्षमता वाढवणे, संकलन आणि वाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम करणे, तसेच नवीन डेपोसाठी जागा शोधण्याबत पर्यायांचा विचार करण्यात आला. यासोबतच शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती आणि वाढत्या गरजेनुसार नवीन स्वच्छतागृहे उभारण्याबतही निर्णय घेण्यात आला.

आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांचा आढावा घेऊन ती लवकर मार्गी लावण्याची मागणी केली.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सर्व यंत्रणांना एकत्रितपणे काम करून पुणेकरांना पावसाळ्यात दिलासा देण्याचे आवाहन केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: