23 Merged Villages DP | 23 गावांसाठी लोकल एरिया प्लॅन करा, विकास आराखड्याची वाट न पाहता काम करा – माजी नगरसेवकांची  मागणी

Homeadministrative

23 Merged Villages DP | 23 गावांसाठी लोकल एरिया प्लॅन करा, विकास आराखड्याची वाट न पाहता काम करा – माजी नगरसेवकांची  मागणी

Ganesh Kumar Mule Jun 11, 2026 8:37 PM

Fursungi -Uruli Devachi Municipal Corporation | उरुळी देवाची आणि फुरसुंगी नगरपरिषद स्थापन करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी  | माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी 
PMC TDR Cell | भूसंपादनासाठी टीडीआर सेल निर्माण करा | माजी नगरसेवकांची मागणी
Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या डोक्यावर कुठली समिती बसवू नये | माजी नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

23 Merged Villages DP | 23 गावांसाठी लोकल एरिया प्लॅन करा, विकास आराखड्याची वाट न पाहता काम करा – माजी नगरसेवकांची  मागणी

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 2021 मध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांसाठी विकास आराखड्याची वाट न पाहता लोकल एरिया प्लॅन तयार करून तातडीने विकासाला सुरुवात करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे. (Pune PMC News)

महापौर, उपमहापौर, सभागृह नेते आणि सर्व गटनेत्यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, पुणे मनपाने 1987 पासून एकही विकास आराखडा पूर्ण केलेला नाही. 23 गावे गेली 5 वर्षे विकासापासून वंचित आहेत. राज्य सरकारने MR&TP ॲक्टमधील कलम 33A, 33B, 33C अंतर्गत केलेल्या बदलाचा फायदा घेऊन 9 महिन्यांत लोकल एरिया प्लॅन मंजूर करता येऊ शकतो.

कायद्यानुसार नियोजन प्राधिकरणाला 6 महिन्यात आराखडा तयार करून राज्य सरकारला सादर करावा लागेल. सरकारने 3 महिन्यात निर्णय न घेतल्यास तो आपोआप मंजूर झाला असे मानले जाईल. यामुळे 23 गावांचे 8 भौगोलिक गट करून PMRDA कडून ताब्यात आलेल्या 122 सुविधा भूखंडांवर तातडीने काम सुरू करता येईल.

याबाबत  निर्णय घेऊन 23 गावांना न्याय द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत पास केलेल्या ठरावाचा दाखला देत करण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: