Pune Water Cut | पुणे शहरात एक दिवसाआड पाणीकपात अटळ! | पुढील आठवड्यापासून अंमलबजावणीची शक्यता

Homeadministrative

Pune Water Cut | पुणे शहरात एक दिवसाआड पाणीकपात अटळ! | पुढील आठवड्यापासून अंमलबजावणीची शक्यता

Ganesh Kumar Mule Jun 03, 2026 6:23 PM

MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे यांचा वानवडी भागात पदयात्रेद्वारा मतदारांशी संवाद
Liquor Shop | सोसायटी धारक ठरवणार व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान हवे कि नको | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा
Mahabudget | राज्याच्या अर्थसंकल्पाबद्दल विरोधी पक्षांना काय वाटते?

Pune Water Cut | पुणे शहरात एक दिवसाआड पाणीकपात अटळ! | पुढील आठवड्यापासून अंमलबजावणीची शक्यता

खडकवासला साखळीत अवघा ५.८७ टीएमसी साठा शिल्लक

| हवामान खात्याचा ८६% कमी पावसाचा इशारा

 

Pune Breaking News – (The Karbhari News Service) –  पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर गेल्याने पुणेकरांवर एक दिवसाआड पाणीकपातीचे संकट ओढवले आहे. पुढील आठवड्यापासून ही कपात लागू होण्याची शक्यता असून, महापालिका आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला कपातीचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. (Pune Water Cut News)

हवामान खात्याने यंदा कमी पावसाचा इशारा दिला आहे. अंदाजानुसार केवळ १४% पाऊस चांगला होईल, तर ८६% पाऊस कमी असणार आहे. त्यामुळे उपलब्ध साठा जपून वापरण्याशिवाय पर्याय नाही.

या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी शहरात एक दिवसाआड पाणीकपात करण्याचा प्रस्ताव तयार करून तो अतिरिक्त आयुक्तांमार्फत महापालिका आयुक्तांसमोर ठेवला आहे. आयुक्तांनी कपातीचे नियोजन करण्याचे आदेश दिले असून, पुढील आठवड्यापासून कपात लागू होऊ शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले. एक दिवस आड पाणीकपात पाण्यात २५% बचत होणार आहे.  त्यानुसार एरिया नुसार आणि रोटेशन नुसार याचे नियोजन केले जाणार आहे. असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गेल्या महिन्यात महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी मे अखेरीस पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पुढील दिशा ठरवण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार आता पाणीकपात अटळ झाली आहे. खडकवासला साखळीत अवघा ५.८७ टीएमसी साठा शिल्लक असल्याने आणि पावसाची अनिश्चितता लक्षात घेता, शहराची तहान भागवण्यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पुणेकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.

धरणांत किती पाणी शिल्लक?

पाटबंधारे विभागाच्या दि. ०२/०६/२०२६ च्या आकडेवारीनुसार पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही प्रकल्पांची स्थिती गंभीर आहे:

खडकवासला धरण साखळी: एकूण क्षमता २९.१५ टीएमसी. यंदा मंजूर कोटा ११.६० टीएमसी. सध्या शिल्लक साठा फक्त ५.८७५ टीएमसी म्हणजे २०.१५%. गेल्यावर्षी याच तारखेला १९.१८% साठा होता. पुण्याला यातून रोज १,५०० MLD पाणी लागते. ३१ जुलैपर्यंत ३.१७७ टीएमसी पाणी पुणे शहरालाआवश्यक आहे.

भामा आसखेड धरण: क्षमता ७.६६ टीएमसी, मंजूर कोटा २.६७ टीएमसी. शिल्लक २.४१० टीएमसी म्हणजे ३१.४९%. गेल्यावर्षी १७.७४% होता. यातून रोज १५० MLD पुरवठा होतो. जुलैअखेर ०.३१८ टीएमसी लागणार.

पवना धरण, रावेत: क्षमता ९.६८ टीएमसी, मंजूर कोटा ०.३४ टीएमसी. शिल्लक २.१९८ टीएमसी म्हणजे २२.६९%. गेल्यावर्षी २६.४३% होता. यातून २७ MLD पाणी येते. जुलैअखेर ०.०५७ टीएमसी गरज.

वडू बंधारा, भीमानदी: यातून रोज ४.५ MLD पाणी घेतले जाते. जुलैअखेर ०.००९ टीएमसी आवश्यक.

एकूण स्थिती: चारही प्रकल्पांची एकत्रित क्षमता ४६.४९ टीएमसी. यंदाचा मंजूर कोटा १४.६१ टीएमसी. सध्या एकूण शिल्लक १०.४८ टीएमसी. ३१ जुलैपर्यंत ३.५६१ टीएमसी पाणी लागणार असून, शहराची प्रतिदिन एकूण गरज १,६८१.५० MLD आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: