Shivsena on Toxic Liquor | प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात शेकडो लिटर बनावट गावठी दारूचा साठा उध्वस्त

HomeBreaking News

Shivsena on Toxic Liquor | प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात शेकडो लिटर बनावट गावठी दारूचा साठा उध्वस्त

Ganesh Kumar Mule May 30, 2026 2:54 PM

PMC Ward 41 – Mohhamadwadi Undri | प्रभाग क्रमांक ४१ – महंमदवाडी – उंड्री | प्रभाग रचनेतील शेवटच्या प्रभागाची हद्द आणि रचना जाणून घेऊ 
Voter List Program | ९ नोव्हेंबरला पुण्यात मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ
Youth Congress Agitation Against PM | पीएम ‘कॉम्प्रमाईज’ असल्याचा आरोप; युवक काँग्रेसचे गुडलक चौकात आंदोलन

Shivsena on Toxic Liquor | प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात शेकडो लिटर बनावट गावठी दारूचा साठा उध्वस्त

| “हडपसरमधील अवैध दारू हातभट्ट्यांवर शिवसेनेचा तुफान हल्लाबोल.”

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे शहरात विषारी दारूमुळे १५ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळलेली असतांना शिवसेनेने हडपसर परिसरातील अवैध दारू व्यवसायाविरोधात थेट रस्त्यावर उतरून आक्रमक कारवाई केली. हडपसर मतदारसंघातील कृष्णानगर, तरवडे वस्ती पोलीस चौकीच्या अगदी पाठीमागे तसेच साठे वस्ती परिसरात खुलेआम सुरू असलेल्या गावठी व बनावट दारूच्या हातभट्ट्यांवर शिवसेनेने तुफान हल्लाबोल चढवत धडक मोहीम राबवली. (Pramod Nana Bhangire Pune Shivsena)

शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी अवैध दारूभट्ट्यांवर कारवाई करत हातभट्ट्या फोडून टाकल्या आणि बनावट गावठी दारूचा शेकडो लिटरचा अवैध साठा उध्वस्त केला. यावेळी प्रमोद नाना भानगिरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “सर्वसामान्य नागरिकांना या अवैध दारू हातभट्ट्या आणि त्यावरील राजरोसपणे सुरू असलेले व्यवहार स्पष्टपणे दिसतात, मग पुणे पोलिसांना ते का दिसत नाहीत?” असा थेट सवाल उपस्थित केला.

The karbhari -Pune News

भानगिरे यांनी पुढे आरोप केला की, शहरातील अनेक भागांमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेले हे अवैध धंदे पोलिसांच्या माहितीसहच सुरू आहेत अशी जनतेमध्ये भावना निर्माण झाली आहे. पोलिसांच्या वरदहस्ताशिवाय अशा प्रकारे खुलेआम दारूभट्ट्या चालू शकत नाहीत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. विषारी दारूमुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात असताना संबंधित यंत्रणा नेमकी काय करत होती, याचे उत्तर पुणे पोलिसांनी जनतेसमोर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

हडपसर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री, हातभट्ट्या आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात शिवसेना सातत्याने आवाज उठवत असून विषारी दारूकांडात १५ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतरही अवैध दारू विक्री सुरू राहणे ही अत्यंत गंभीर बाब असून यापुढे अशा दारू माफियांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला,पुणे शहरात अवैध दारू व्यवसाय कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दारू माफियांविरोधात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कारवाईवेळी प्रमोद नाना भानगिरे यांच्यासमवेत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, शाखाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्या या धडक कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अवैध दारू व्यवसायाविरोधातील लढा आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळाले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: