PMC Safai Karmchari | सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी आता ‘फेस रेकग्निशन’ सक्तीचे | वेतन थेट हजेरीशी लिंक

Homeadministrative

PMC Safai Karmchari | सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी आता ‘फेस रेकग्निशन’ सक्तीचे | वेतन थेट हजेरीशी लिंक

Ganesh Kumar Mule May 30, 2026 8:31 AM

Sinhgadh Road Flyover | सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा तिसरा टप्पा कधी सुरु होणार? | महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले स्पष्टीकरण 
PMC Audit Sub-Committee | आकाशचिन्ह विभागाच्या ४०४ कोटी वसुलीची ऑडीट उपसमितीत चर्चा करणार | स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती 
PMC Recruitment | महापालिका भरतीला अल्प प्रतिसाद! | फक्त 4 हजाराच्या आसपास अर्ज | 28 मार्च पर्यंत करू शकता अर्ज

PMC Safai Karmchari | सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी आता ‘फेस रेकग्निशन’ सक्तीचे | वेतन थेट हजेरीशी लिंक

| अतिरिक्त आयुक्तांचे आदेश : बोगस हजेरीला चाप बसणार

 

Pune PMC Employees – (The Karbhari News Service) : पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत काम करणाऱ्या सर्व कायम व कंत्राटी सफाई सेवकांची दैनंदिन हजेरी आता ‘फेस रेकग्निशन’ प्रणालीद्वारेच नोंदवली जाणार आहे. तसेच जिओ फेन्स केलेल्या झाडण हद्दीच्या दैनंदिन अहवालानुसारच त्यांचे मासिक वेतन अदा करण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण आदेश अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर (Prajit Nair IAS) यांनी काढला आहे.  (PMC Solid  Waste Management Department)

काय आहे आदेशात?

अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) प्रजित नायर यांनी दि. २६  रोजी काढलेल्या कार्यालयीन आदेशानुसार:
फेस रेकग्निशन अनिवार्य: दैनंदिन झाडणकाम तसेच इतर स्वच्छता विषयक कामकाज करणाऱ्या सर्व कायम व कंत्राटी सफाई सेवकांची हजेरी एच.एम.एस. फेशियल फेस रेकग्निशन अ‍ॅपमध्येच नोंदवावी लागणार आहे. यापूर्वीच सर्व सेवकांचे डिजिटल अटेंडन्ससाठी अ‍ॅपमध्ये रजिस्ट्रेशन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
जिओ फेन्सिंग: क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्व झाडण हद्दीत एच.एम.एस. फेशियल अ‍ॅपमध्ये जिओ फेन्सिंग करण्यात आले आहे. त्यामुळे सफाई सेवकाने नेमक्या ठिकाणी हजर राहूनच हजेरी लावणे बंधनकारक असेल.
वेतन हजेरीवर अवलंबून: फेस रेकग्निशननुसार व जिओ फेन्स केलेल्या झाडूहट्टीच्या दैनंदिन अहवालानुसार सर्व कायम व कंत्राटी सफाई सेवकांचे मासिक वेतन अदा करण्यात यावे, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

बोगस हजेरीला चाप बसणार
यापूर्वी दि. २३ फेब्रुवारी रोजीच्या परिपत्रकानुसार सूचना देऊनही अनेक ठिकाणी प्रत्यक्ष हजेरीशिवाय पगार काढले जात असल्याच्या तक्रारी होत्या. आता फेस रेकग्निशन व जिओ फेन्सिंगमुळे बोगस हजेरी प्रकारांना पूर्णपणे चाप बसणार आहे. सेवक कामाच्या ठिकाणी हजर असल्याशिवाय त्याची हजेरी लागणारच नाही.

या आदेशाची माहिती सर्व सफाई सेवकांना देण्यात यावी व सर्व सेवकांची दैनंदिन हजेरी फेस रेकग्निशननुसार घेतली जाईल याची दक्षता घ्यावी, असे उपायुक्त परिमंडळ क्र. १ ते ५ व सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांना कळवण्यात आले आहे.

पारदर्शकतेसाठी पाऊल
“स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामात पारदर्शकता यावी, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी हजेरी लागावी व नागरिकांचा पैसा योग्य ठिकाणी खर्च व्हावा यासाठी हा निर्णय घेतला आहे,” असे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले. या निर्णयामुळे कामचुकारपणाला आळा बसेल व शहरातील स्वच्छतेचा दर्जा सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0